Fact Check: अखेर रामसेतू सापडला? समुद्रात हनुमानाची भव्य मूर्तीही सापडली? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Truth Behind Viral AI-Generated Ram Setu Video: रामसेतू सापडलाय, होय रामसेतू सापडल्याचा दावा करण्यात आलाय...एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय...त्यामुळे खरंच आता रामसेतू सापडलाय का...? असा प्रश्न पडलाय...या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
रामसेतू सापडल्याचा दावा करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडिओ खोटा असून एआयच्या मदतीने बनवण्यात आल्याचं पडताळणीत उघड झालं आहे.
रामसेतू सापडल्याचा दावा करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हिडिओ खोटा असून एआयच्या मदतीने बनवण्यात आल्याचं पडताळणीत उघड झालं आहे.saam tv
Published On

...हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय...रामसेतूचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आलाय...समुद्रात सापडलेला हा रामसेतूच असून, यासोबत हनुमानाची मूर्तीही सापडलीय असा दावा केलाय...या व्हिडिओत हा रामसेतू आणि मूर्ती दाखवण्यात आलीय...

भारत-श्रीलंका यामध्ये असणाऱ्या हिंदी महासागरात राम सेतू असल्याची आख्यायिका आहे...आणि त्याचे पुरावेही सापडल्याचा दावा करण्यात आला...रामेश्वरममध्ये तरंगणारे दगड अजूनही दिसतात...पण, आता थेट काही रामसेतूच सापडल्याचा व्हिडिओ समोर आलाय...या व्हिडिओत बघा, जसा पूल असतो त्याप्रमाणेच हा सेतू असल्याचा हा व्हिडिओ आहे...स्कूबा ड्रायव्हर्स पाण्याखाली अनेक मोठ्या दगडी मूर्तींचा शोध घेताना दिसतायत...त्यांना काही मूर्त्या, दगड आणि काही वस्तूही सापडल्यायत...पण, खरंच आता राम सेतू सापडलाय का...? हा व्हिडिओ खरा आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...हा व्हिडिओ आम्ही नीट तपासून पाहिला...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल व्हिडिओचा रामसेतूशी संबंध नाही

पाण्याखाली दिसणारे हे दगड रामसेतू नाही

रामसेतूचा हा व्हिडिओ एआयने तयार केलाय

रामभक्तांची दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांना हा रामसेतू असल्याचं वाटतंय...काहींनी तर दर्शनही घेतलंय...मात्र, असे व्हिडिओ व्हायरल करून सगळ्यांची दिशाभूल केली जातेय...आता एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटिलिजेन्सच्या माध्यमातून असे व्हिडिओ बनवणं शक्य आहे...त्यामुळे त्याचा गैरवापर केला जातोय...आमच्या पडताळणीत आणखी मोठा रामसेतू सापडल्याचा दावा असत्य ठरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com