Shocking: निव्वळ प्रेम! ९३ वर्षांचे आजोबा बायकोसाठी दागिने खरेदी करायला गेले, खिशात फक्त १२०० रुपये; सराफाने चक्क...|VIDEO

Sambhajinagar Viral Video: संभाजीनगरमधून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ९३ वर्षांच्या आजोबांचा आजीप्रती असणारे प्रेम पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं.
Shocking:  निव्वळ प्रेम! ९३ वर्षांचे आजोबा बायकोसाठी दागिने खरेदी करायला गेले, खिशात फक्त १२०० रुपये; सराफाने चक्क...
Shocking News Saam Tv
Published On

९३ वर्षांच्या आजोबांचे आपल्या बायकोवर असणाऱ्या प्रेमाचा एक असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या वयामध्ये आपल्या बायकोचा हट्ट पुरवणाऱ्या आजोबांचं सध्या चांगलंच कौतुक होतंय. आजीला आवडलेले दागिने खरेदी करण्यासाठी आजोबांची धडपड आणि आजीवर असणारे प्रेम आजच्या तरुणपिढीसाठी खूप चांगला संदेश देऊन जात आहे. तर दुसरीकडे या आजी-आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या ज्वेलर्सचे देखील खूप कौतुक केलं जात आहे. आपुलकी, प्रेम आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे.

सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधणारा हा व्हिडीओ छत्रपती संभाजीनगर येथील आहे. संभाजीनगरमधील औरंगपूरा पोलिस ठाण्यासमोर गोपिका ज्वेलरी शॉप आहे. या गोपिका ज्वेलरी शॉपमध्ये वन ग्रॅम ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी मिळतात. वेगवेगळ्या युनिक डिझाइन्स, मरमोळया स्टाईलमधले अगदी सोन्यासारखे दिसणारे दागिने या शॉपमध्ये मिळतात. हे शॉप महिलांसाठी खास आकर्षण ठरते. या ज्वेलरी शॉपच्या मालकापासून ते काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्वजण ग्राहकांशी आपुलकी आणि प्रेमाने वागतात. त्यामुळे याठिकाणी ग्राहकांची देखील मोठी गर्दी असते. या ज्वेलरी शॉपचे इन्स्टाग्रामवर पेज असून त्यावरून आपल्याला ग्राहकांकडून या शॉपला मिळणारा प्रतिसाद पाहायला मिळतो.

Shocking:  निव्वळ प्रेम! ९३ वर्षांचे आजोबा बायकोसाठी दागिने खरेदी करायला गेले, खिशात फक्त १२०० रुपये; सराफाने चक्क...
Shocking Video: समुद्रकिनाऱ्यावर उभी राहून सेल्फी काढत होती, अचानक एक जोरदार लाट आली अन्...पाहा VIDEO

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आजी-आजोबा गोपिका ज्वेलर्स या शॉपमध्ये आले आहेत. या शॉपचे मालक दोघांचीही प्रेमाने आणि आदराने विचारपूस करत आहेत. या तिघांच्या संभाषणातून असे दिसून येते की, यापूर्वीदेखील हे आजी-आजोबा या शॉपमध्ये आले होते. पण तेव्हा या शॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे दोघे पैसे मागायला आले असल्यासारखे वाटले आणि त्यांनी दोघांनाही परत जायला सांगितले.

Shocking:  निव्वळ प्रेम! ९३ वर्षांचे आजोबा बायकोसाठी दागिने खरेदी करायला गेले, खिशात फक्त १२०० रुपये; सराफाने चक्क...
Shocking News: एक विवाह ऐसा भी... गर्लफ्रेंडनं आयुष्य संपवलं, बॉयफ्रेंडने मृतदेहासोबत केलं लग्न, उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू

बायकोला आवडलेले दागिने घेण्यासाठी आजोबा आजीला घेऊन पुन्हा या शॉपमध्ये येतात. आजोबा ९३ वर्षांचे आहेत. त्यांनी आजीसाठी पोत आणि डोरलं पसंत केलं होतं. आजीला हे दोन्ही दागिने खूप आवडले. दोघेही हे दागिने घेण्यासाठी शॉपच्या मालकाला पैसे देतात. त्यांच्याकडे फक्त बाराशे रुपये असतात. आजी शॉपच्या मालकाला विचारते याचे पैसे किती होतील. शॉपचा मालक त्यांना विचारतो तुमच्याकडे किती पैसे आहेत. तर ते १२०० रुपये दाखवतात. त्यानंतर आजोबा त्यांच्या पिशवीमध्ये असलेल्या सुट्टया पैशांचं छोटंसं गाठोडं काढून देतात. आपल्याकडे आणखी पैसे आहे असं देखील ते शॉपच्या मालकाला सांगतात.

यावर शॉप मालक म्हणतात, मी एवढे पैसे घेणार नाही.कमी द्या. मग आजी- आजोबा त्यांना हजार रुपये देतात. तेवढेही पैसे शॉप मालक घेत नाही. त्यावेळी आजोबा पाचशेची नोट घ्या म्हणतात. पण शेवटी मालकाने सर्व पैसे माघारी देऊन केवळ दोघांकडून फक्त १०-१० रुपये घेतले. हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. एवढे पैसे खूप झाले. मी हे जपून ठेवेल, असं म्हणून शॉप मालकाने त्यांच्याकडून फक्त २० रुपये घेतले. यावेळी आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी येते. दोघेही आश्रू पुसतात आणि शॉप मालकाला आशीर्वाद देतात. फक्त आशीर्वाद घेऊन आजी-आजोबांची इच्छा पूर्ण करणाऱ्या या ज्वेलरी शॉपच्या मालकावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Shocking:  निव्वळ प्रेम! ९३ वर्षांचे आजोबा बायकोसाठी दागिने खरेदी करायला गेले, खिशात फक्त १२०० रुपये; सराफाने चक्क...
Shocking Crime: '२ हजार द्या डेडबॉडी गुंडाळतो'; मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा लाचखोर सीसीटीव्हीत कैद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com