Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये वॉशरूमला जाण्यासाठी तो स्पायडरमॅन झाला; व्हिडिओ तुफान व्हायरल

Spider Man in Train : स्पायडरमॅन ज्या पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्याठिकाणी जातो त्या प्रमाणे हा व्यक्ती एका सीटवरून दुसऱ्या सीटपर्यंत पोहचत आहे. वॉशरूमला जाण्यासाठी त्याने केलेली करत पाहून सारेच चकित झालेत.
Viral Video
Viral VideoSaam TV

Viral Video :

सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लोकल ट्रेन असो किंवा मग स्लीपर कोच असलेली एक्स्प्रेस ट्रेन, येथे नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. अशाच तुफान गर्दीचे आजवर अनेक हस्यास्पद व्हिडिओ समोर आले आहेत. आता देखील असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल.

Viral Video
Accident Video: भरधाव वेगातील टॅंकर उलटला, महामार्गावर भीषण स्फोट; अपघाताचा VIDEO व्हायरल

सोशल मीडियावर दिसत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ही एक स्लीपर कोच असलेली एक्स्प्रेस ट्रेन आहे. लांबच्या पल्ल्याची ही ट्रेन प्रवाशांनी तुडुंब भरली आहे. अगदी खाली पाय ठेवण्यासाठी देखील जागा नाही अशी परिस्थिती आहे. मात्र अशात एका व्यक्तीला वॉशरूमला जायचे असते. आता जावे असे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या व्यक्तीने जी काही शक्कल लढवलिये त्यानेच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्यक्तीने खाली चालण्यासाठी जागा नसल्याने वरती असलेल्या सीटवरून चालण्यास सुरुवात केली आहे. स्पायडरमॅन ज्या पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्याठिकाणी जातो त्या प्रमाणे हा व्यक्ती एका सीटवरून दुसऱ्या सीटपर्यंत पोहचत आहे. वॉशरूमला जाण्यासाठी त्याने केलेली करत पाहून सारेच चकित झालेत. प्रवाशांमध्ये असलेल्या एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये सदर व्यक्तीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे.

@logkyakahaenge या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करत यावर कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, वॉशरूमला जाण्यासाठी तरुण स्पायडरमॅन, स्लीपर कोच. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील अनेक हसण्याचे ईमोजी पाठवले आहेत. हे तर नेहमीच आहे, मुंबई लोकल ट्रेन आणि एक्स्प्रेस ट्रेनमध्ये नेहमीच ही परिस्थिती असते असंही काहींनी कमेंटमध्ये लिहिलं आहे.

लांब जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रत्येक नागरिक तिकीट काढून प्रवास करतो. कारण येथे नेहमी टीसी असतात. आता तिकीट काढून देखील अनेक प्रवाशांना अशा पद्धतीने मोठ्या अडचणींना समोर जात प्रवास करावा लागतो. मुंबई लोकल ट्रेनमध्ये देखील नेहमीच तुफान गर्दी असते. शिवाय कर्जत आणि कसारा येथून देखील अनेक नागरिक नोकरीसाठी मुंबईत रोज येत असतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत, अशी मागणी देखील अनेक प्रवाशी वारंवार करतात.

Viral Video
Udayanraje Bhosale : सातारा लाेकसभा मतदारसंघ: 'सेवानिवृत्ती जाहीर करा, एकेकाकडे बघताेच'; उदयनराजे भोसलेंच्या वक्तव्यावर हशा आणि टाळ्या (VIDEO)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com