Viral Video: सावधान! गर्दीत तुमचाही खिसा होऊ शकतो साफ; चोराची हातचलाखी एकदा पाहाच| VIDEO

Trending Viral Video: एका चोराच्या हात चलाखीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Trending Viral Video
Trending Viral VideoSaamtv

Viral Video News:

गर्दीच्या ठिकाणी चोरांपासून, खिसेकापूंपासून सावध रहा अशा सुचना वारंवार दिल्या जातात. गर्दीत खिसेकापू कधी हातसाफ करुन जातात हे समजत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चोराची हातसफाई कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Trending Viral Video
Nana Patole News: राज्य सरकार जनतेच्या जीवावर उठलेय; नाना पटोले यांची सरकारवर टीका

बसस्थानक, रेल्वे स्टेशन या ठिकाणी चोरांचा सुळसुळाट हा ठरलेलाच. जरा गर्दी झाली की चोर कधी हात साफ करुन जातात हे लक्षातही येत नाही. त्यामुळेच अशा ठिकाणी जाताना काळजी घेणे गरजेचे असते. सध्या एका चोराच्या हात चलाखीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, चोराने काही क्षणात गर्दीचा फायदा घेत तरुणाचे पाकीट काढून घेतले. गर्दीचा फायदा घेवून हे लोक कसा हात साफ करतात हेच या व्हिडिओमधून दिसत आहे. एका बस स्थानकावरील या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, लोक गर्दीने बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. याचसंधीचा फायदा घेवून चोर पाकिट मारण्याच्या प्रयत्नात आहे. बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाच्या खिशात हा चोर हात टाकतो. खच्चून गर्दी असल्यामुळे समोरील तरुणाला त्याची जराही कल्पना नसते.

अगदी बसमध्ये त्याच्या पाठोपाठ चढत असल्याचाच आव आणत हा चोर तरुणाच्या खिशातील पाकिट काढताना दिसत आहे. शेवटी पाकिट हाती लागताच हा चोर तिथूनच पळ काढतो. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार इतक्या जलदपणे होतो की एवढ्या गर्दीत कोणालाच याचा पत्ता लागत नाही.

या चोराची ही हातचलाखी कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कर्नाटकमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. नेटकऱ्यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून गर्दीत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच काही जणांनी व्हिडिओ काढण्यापेक्षा चोराला पकडायचं ना? असा सल्लाही दिला आहे. (Latest Marathi News)

Trending Viral Video
Delhi-NCR Earthquake: 'ती' भविष्यवाणी खरी ठरली! दिल्लीपासून उत्तराखंडरपर्यंत भूकंपाचे हादरे; पाहा VIDEO

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com