गुरूचं स्थान सर्वांच्या आयुष्यात खूप महत्वाचे असतं. परंतू शिक्षक आणि विद्यार्थांच्या नात्याला धक्का पोहचणारा प्रकार राजधानी दिल्लीत घडलाय. विद्यार्थ्याने वर्गात आपल्या शिक्षकावरच चपलेचा वर्षाव केलाय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.(Latest Marathi News)
ही घटना प्रसिद्ध'फिजिक्स वाला' या ॲपच्या लाईव्ह क्लासमध्ये घडलीये. घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतोय. 'फिजिक्स वाला' हे देशातील लोकप्रिय ऑनलाइन क्लासपैकी एक आहे.
अलाहाबाद येथील शिक्षक अलख पांडे यांनी २०१६ रोजी या क्लासची सुरूवात केली आणि त्यांचे सहकारी प्रतीक महेश्वरी याच्यां मदतीने 'फिजिक्स वाला ॲप ' विकसित केले. हे ॲप उच्च पात्रता अभ्यासक्रमाची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेय. 'फिजिक्स वाला' या ॲपला लोकप्रियता मिळाली आहे.
@kaleshkomedy या पेजवरून हा व्हिडिओ सर्वप्रथम सोशल मिडीयावर शेअर केलाय. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "लाइव्ह क्लास दरम्यान फिजिक्सवाला विद्यार्थी शिक्षक यांमधील थप्पड-कलेश "
मिळालेल्या माहितीनुसार, या मारहाणीचे कारण फक्त एवढंच होतं की, या विद्यार्थ्याने शिक्षकास प्रश्न विचारला होता, मात्र वारंवार प्रश्न विचारून ही शिक्षकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. वारंवार प्रश्न विचारल्याने विद्यार्थ्याची चिडचिड झाली होती.यामुळे विद्यार्थ्याने शिक्षकास मारहाण केली.
नेमक काय घडल ?
फिजिक्स वाला 'ॲपवर लाईव्ह क्लास सुरू होता. या लाईव्ह क्लासवर अनेक ऑनलाईन विद्यार्थी शिकत होते. तसेच ज्या ठिकाणावरून हे शिकवलं जात होतं,तिथल्या एका विद्यार्थ्याने हे कृत्य केलंय. लाईव्ह क्लास सुरू असताना एक विद्यार्थी शिक्षकाच्या दिशेने धावत येतो आणि सरांना चप्पलकाढून मारहाण करण्यास सुरूवात करतो.
यात शिक्षक स्वता:चा बचाव करण्यास यशस्वी ठरतात. त्यानंतर तो विद्यार्थी चप्पल घेऊन गायब होतो. यामुळे सर्वजण चकित होतात. क्लासेस लाईव्ह असल्यामुळे ही घटना सर्वत्र व्हायरल झाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांसह सर्वचजण गोंधळून गेलेत. तसेच त्या विद्यार्थ्यावर सर्व स्तरातून सतांप व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.