Crocodile Viral Video : बापरे! कृष्णा नदीपात्रात मगरीच मगरी! शेतातही मगरींची पिल्लं

Sangli Crocodile Viral Video: सांगलीत गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे पाण्यातील प्राणी जमिनीवर येऊ लागले आहेत. सांगलीत कृष्णा नदीपात्रातील मगरींची पिल्ले आता जमिनीवर आली आहेत.
Crocodile Viral Video
Crocodile Viral VideoSaam Tv
Published On

पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात अनेक प्राणी आपल्या घरट्यांबाहेर येतात. पावसाळ्यात प्राणी जिथे राहतात. तिथे पाणी साचते. त्यामुळे प्राणी बाहेर येतात. रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यात प्रामुख्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा समावेश असतो. यामुळे मात्र, नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते. सांगलीत असेच कृष्णा नदीपात्रात मगरींची पिल्ले बाहेर आल्याचे दिसत आहे. सांगलीतील हरिपूर ते औंदूबरच्या कृष्णा नदीपात्रात मगरींची घरटी होती. पावसाळ्यात आता या घरट्यांमधील मगरींची पिल्ले बाहेर येत आहे. याचाच एक व्हिडिओ समोर आला आहे.

सांगलीत गेल्या चार दिवसांपासून कृष्णा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे पाण्यातील जलचर प्राणी जमिनीवर येत आले. ही मगरींची पिल्ले आजूबाजूच्या मळी भागात जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काम करताना काळजी घेणे गरजेचे आहे. याच मगरींच्या पिल्लांचा व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओत पाण्याखाली एक मगर असलेली दिसत आहे. मगर आपल्या पिल्लांवर लक्ष ठेवताना दिसत आहे. मगरीची अनेक लहान लहान पिल्ले पाण्याच्या वर जमिनीवर आल्याचे दिसत आहे. जवळपास ५-७ मगरीची पिल्ले असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मगरीची पिल्ले शेतकऱ्यांच्या शेतात जाऊ शकतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

Crocodile Viral Video
Funny Video: झोका घ्यायला गेलेल्या तरुणाने झाडच पाडले, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

सांगलीत महापुरानंतर मगरींची संख्या वाढली आहे. पूर्वी अगदी मोजक्याच ठिकाणी मगर आढळून यायची. मात्र, आता अनेक ठिकाणी मगर वास्तव्यास आहे. ओलसर मातीत घरट करुन असणारी मगर चाळीस ते साठ अंडी देते. या अंडीवर ती पालापाचोळा झाकून ठेवते. जवळपास नव्वद दिवसानंतर ही पिल्ले बाहेर येतात. जून महिन्यात नदीकाठी ही पिल्ले दिसून येतात. नदी हेच मगरींच्या वास्तव्याचे ठिकाण आहे. नदीचे पाणी वाढल्याने मगरींची घरटी उद्धवस्त होतात. त्यामुळे मगर आपल्या पिलांसह शेताच्या बाजूला सरकते.

Crocodile Viral Video
School First Day: गडबड गोंधळ अन् रडणं, शाळेच्या पहिल्या दिवशी लहान मुलांची घाई; VIDEO पाहून तुमच्याही जुन्या आठवणी होतील ताज्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com