Samosa: समोसासाठी चप्पलेने तुडवलेले बटाटे? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Samosa Making Video Viral : सोशल मीडिया एक समोसा बनवणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहून तुम्ही समोसा खाणं सोडून द्याल. काय आहे हा व्हिडिओ ते पाहू या.
Samosa: समोसासाठी चप्पलेने तुडवलेले बटाटे? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?
Published On

संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी

आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची, तुम्ही समोसा, वडा खात असाल तर ही बातमी नीट पाहा. कारण, एक व्हिडिओ व्हायरल होतोय. तो व्हिडिओ पाहून तुम्ही समोसा, वडे खाणं सोडाल. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

हा किळसवाणा व्हिडिओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. ही व्यक्ती चपल घालून समोसा, बटाटा वड्यांसाठी लागणारे बटाटे चपलेनं तुडवतोय.

व्हायरल व्हिडिओ

एक व्यक्तीने भांड्यात उकडलेले बटाटे ठेवले आहेत.

ते बटाटे बारीक करण्यासाठी पायात चप्पला घातल्या.

चप्पल घालून पायाने बटाटे बारीक केले जातायत, असं या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Samosa: समोसासाठी चप्पलेने तुडवलेले बटाटे? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?
Air Pollution: हवेच्या प्रदूषणामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. काही जण बोलतायत की हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातीलच आहे.तर काहीजण सोशल मीडियावर म्हणतायत हा व्हिडिओ मुंबईचा आहे.असे अनेकजण तर्कवितर्क लावतायत. समोसा, बटाटा वडा हा आपल्या जीवाळ्याचा विषय आहे. जेवणाचा डबा नसेल तर लोक बटाटा वडा, समोसा खाऊन दिवस काढतात.त्यामुळे हा व्हिडिओ कुठला आहे.? डर्टी समोसा बनवण्यामागचं काय सत्य आहे? हे शोधून काढण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी केली.

मुंबईतील काही संबंधित अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ दाखवला.मात्र, हा व्हिडिओ मुंबईतील नसल्याचं त्यांनी सांगितलं.त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी गुगल रिव्हर्स सर्चच्या माध्यमातून केली.त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात

साम इन्व्हिस्टिगेशन

व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही.

हा व्हिडिओ गाजियाबादमधील असल्याचं स्पष्ट झालं

व्हिडिओ गाजियाबादच्या कुमार स्वीट्स कॉर्नर दुकानातील आहे

सजग नागरीकाने व्हिडिओ लपून बनवण्यात आलाय.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या समोसा विक्रेत्यावर कारवाईदेखील करण्यात आलीय.

लोकांच्या आरोग्याशी खेळून ही व्यक्ती समोसा बनवत असल्याचं समोर आलं.त्याच्यासह दुकान मालकावर कारवाई करण्यात आलीय.मात्र, तुम्ही समोरे, बटाटे वडे किंवा काही खाद्य पदार्थ कुठे खात असाल तर तुमच्या ओळखीच्या हॉटेलमध्येच खा. नाहीतर असे भामटे आपला जीव घेतील.आमच्या पडताळणीत हा व्हिडिओ सत्य असल्याचं समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com