Study Video: परीक्षेच्या एक दिवस आधी पुस्तकांना लावलं सलाईन; विद्यार्थ्याचा हास्यास्पद जुगाड व्हायरल

Viral Video : सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. आजपासून दहावीच्या परीक्षांना देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर परीक्षेबाबत अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Study Video
Study VideoSaam TV
Published On

Study Viral Video :

माणसाला आजारी असताना अशक्तपणा आल्यास त्याला सलाईन लावले जाते. सलाईनमुळे पोटात अन्न नसले तरी व्यक्ती काही दिवस आणखी जगू शकतात. अशात एका तरुणाने थेट आपल्या पुस्तकांना सलाईन लावलं आहे. परीक्षेचा अभ्यास न झाल्याने त्याने असा जुगाड शोधून काढला आहे. सध्या या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Study Video
Night Study Tips: रात्री अभ्यास करताना झोप येतेय? तर या टिप्स करा फॉलो..

सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. आजपासून दहावीच्या परीक्षांना देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर परीक्षेबाबत अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यातील अनेक व्हिडीओमध्ये विद्यार्थी परीक्षेला कॉपी कसे करतात हे दाखवण्यात आलं आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी यावर हसण्याचे ईमोजी पाठवले आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या तरुणाने बेडवर सर्व पुस्तके उघडून ठेवली आहेत. तसेच त्यांना सलाईन लावून आपल्या कपाळाला ते जोडले आहेत. या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या एक दिवस आधी असा अभ्यास केला जातो, असं कॅपशन लिहिलं आहे. अनेक विद्यार्थी वर्षभर काहीच अभ्यास करत नाहीत.

उद्या आपली परीक्षा आहे हे देखील काही विद्यार्थ्यांना माहिती नसते. असे विद्यार्थी सर्व अभ्यास एका रात्रीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. काही जण कॉपीसाठी नोट्स बनवतात तर काही अशा प्रकारे जुगाड शोधतात. मात्र हा फक्त मजेशीर हसण्याचा विषय आहे.

असं करणारे विद्यार्थी परीक्षेत 100 टक्के नापास होतात. या आधी देखील सोशल मीडियावर उद्या परीक्षा असताना एक दिवस आधी मुलं कसे अभ्यास करतात याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ @t2filmz या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.

Study Video
Palghar Crime News : माथेफिरूकडून दोन सख्ख्या भावांची हत्या; धक्कादायक घटनेनं पालघर हादरलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com