Viral Video: टोस्ट कसे तयार होतात बघितलं का? एकदा VIDEO पाहा तर खरं....

Viral Video: आपल्यापैकी प्रत्येकाच्या दिवसाची सुरूवात ही मसालेदार अशा चहाने होते.
Rusk Making Viral Video
Rusk Making Viral VideoSaam Digital
Published On

Rusk Making Viral Video

आपल्यापैकी प्रत्येकाच्या दिवसाची सुरूवात ही मसालेदार अशा चहाने होते. सकाळच्या आणि संध्याकाळच्या चहाशिवाय दिवस पूर्ण झाल्याशिवाय वाटत नाही. चहासोबत आपल्याला काहीतरी चटपटीत असे पदार्थ हवे असतात, कधी गरमागरम पोहे, तर कधी हमखास खाल्ले जाणारे टोस्ट. पण तुम्ही कधी विचार केला का?टोस्ट कसे तयार होत असतील. अशातच सोशल मीडियावर टोस्ट बनवण्याच्या पद्धतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही टोस्ट खाणे कायमचे विसरुन जाल...('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rusk Making Viral Video
Cake Making Viral Video : केक बनवण्याचा डेंजर व्हिडीओ! तुम्हीच म्हणाल डिलिशिअस नव्हे तर एकदम डेंजर

टोस्ट बनवण्याचा व्हिडीओ हा @Ananth_IRAS सोशल मीडियावरील एक्स अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. टोस्ट बनवण्याची पद्धत एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये कैद केलीये. या आधीही आपण प्रसिद्ध गोड आग्रऱ्याचे पेठे बनवताना व्हायरल व्हिडीओ पाहिला आहे. यासर्व व्हिडीओमुळे लोकांची भूक तसंच खाण्याची इच्छा कमी झालेली आहे. पण व्हायरल व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे हे समजू शकले नाही.

टोस्ट बनवण्याची पद्धत...

व्हायरल व्हिडीओत सुरूवातीस काही व्यक्ती हाताला ग्लोव्ह्ज न घालता टोस्टसाठीचे पीठ मळत आहेत. त्यानंतर एक व्यक्ती मोठ्या भांड्यात असलेल्या पीठात काही पदार्थ मिसळतो. तसंच तो मीठही टोकतो. सर्व पदार्थ टाकल्यानंतर हाताने एकजीव करतो पण हे करताना दुसऱ्या बाजूला धूम्रपान करत आहे. मग त्या भाड्यांतील पीठ एकजीव करतात. पुन्हा सुरुवातीचे पीठ आणि नंतर तयार केलेले पीठ एकत्रित करुन परत घट्ट करतात. या तयार झालेल्या पीठाचे मोठ्या आकाराचे गोळे तयार करतात,त्यानंतर पीठाचे तयार केलेले गोळे भाजण्यासाठी भट्टीत ठेवतात. तयार झाल्यानंतर लहान लहान आकारात कापताना व्हिडीओत दिसत आहे. परत कापल्यानंतर कडक आणि योग्य पद्धतीने भाजण्यासाठी भट्टीत ठेवले जातात. मग शेवटला एका मोठ्या ट्रेमध्ये काढले जातात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रियेचा वर्षाव होत आहे. या व्हिडीओला ६ लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. एका यूजरने लिहील आहे,'हे सगळं खाऊन मी खूप मोठा झालोय आणि आज मला त्याची किळस येत आहे'. तसंच बाकी यूजर्संनी या व्हिडीओवर नाराजी दर्शवली आहे.

Rusk Making Viral Video
Cake Making Video Viral: बेकरीतला केक कसा बनवतात? VIDEO पाहून केक खाणं सोडून द्याल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com