Bihar Balcony Collapse: लग्नसमारंभात घडली भयानक घटना, नवरा-नवरी एकमेकांना पुष्पहार घालताना अचानक छत कोसळलं अन्

Gaya Marriage Viral Video: या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
Gaya Marriage Viral Video
Gaya Marriage Viral VideoSaam Tv

Bihar News: बिहारच्या (Bihar) गयामध्ये लग्नसोहळ्यात (Marriage) मोठी दुर्घटना घडली आहे. लग्न पाहण्यासाठी बंगल्यातील बाल्कनीवर अनेक महिलांनी मोठी गर्दी केली होती. त्याचदरम्यान अचानक बाल्कनी कोसळली. या घटनेमुळे लग्नसोहळ्यात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे 12 महिला जखमी झाल्या. या घटनेचा व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

Gaya Marriage Viral Video
Viral Video: लेकीला पार्किंगमध्ये झोपवून आई कामासाठी गेली अन् विपरित घडलं; गाढ झोपेत असतानाच SUV थेट... पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गया जिल्ह्यातल्या फेतहपूर गावामध्ये घडली आहे. 21 मे रोजी या ठिकाणी लग्नसोहळा पार पडला. त्याचवेळी ही मोठी घटना घडली. निर्माणाधीन घराच्या बाल्कनीमध्ये लग्नसोहळा पाहण्यासाठी काही महिलांनी गर्दी केली होती. या बाल्कनीमध्ये जास्त लोकं उभी राहिल्यामुळे जास्त वजन झाले. त्यानंतर काही क्षणातच बाल्कनी कोसळली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लग्नसोहळा सुरु आहे. स्टेजवर नवरा-नवरी उभे आहेत. फोटोग्राफर व्हिडिओ शूट करत आहे. नवरा-नवरी एकमेकांना पुष्पहार घातल आहेत. हे पाहण्यासाठी शेजारच्या बंगल्याच्या बाल्कनीवर महिला उभ्या राहिल्या आहेत. अचानक क्षमतेपेक्षा जास्त लोकं उभं राहिल्यामुळे बाल्कनी कोसळून सर्वजण खाली पडतात.

Gaya Marriage Viral Video
Viral Video: मुख्याध्यापिका अन् शिक्षिकेमध्ये जोरदार जुंपली! झिंज्या धरुन दे दणादण हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

फतेहपूर गावामध्ये नानू यादव यांच्या घरी लग्न होते. लग्नसोहळ्यात नवरा-नवरी एकमेकांना पुष्पहार घालत होते. त्याचवेळी अचानक छत कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर लग्नसमारंभात एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर लग्नसोहळ्यातील अनेक विधी ताबडतोब थांबवण्यात आले. लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ जखमी महिलांना रुग्णालयात दाखल केले.

या घटनेमध्ये 12 महिला गंभीर जखमी झाल्या. या महिलांवर नजीकच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना कॅमेरात कैद झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. जखमी झालेल्या सर्व महिलांची प्रकृती स्थिर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com