Viral Video: मुख्याध्यापिका अन् शिक्षिकेमध्ये जोरदार जुंपली! झिंज्या धरुन दे दणादण हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

School Teacher Fighting Viral VIdeo: वर्गातून थेट शेतात पोहोचलेल्या या भांडणाचा जबरदस्त व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे...
Viral Video Bihar
Viral Video BiharSaamtv

Bihar Viral Video: बिहारची राजधानी पाटणा येथील बिहताच्या सरकारी शाळेत महिला मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात झालेल्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाळेची खिडकी लावण्यावरून दोन शिक्षकांमध्ये वाद सुरू झाला. हे प्रकरण इतकं तापलं की दोन्ही शिक्षिका एकमेकांशी भांडू लागल्या.

हा वाद विकोपाला जाताच दोन्ही महिला शिक्षकांनी एकमेकींना तुफान हाणामारी करण्यास सुरूवात केली. या भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video Bihar
Viral Video: लेकीला पार्किंगमध्ये झोपवून आई कामासाठी गेली अन् विपरित घडलं; गाढ झोपेत असतानाच SUV थेट... पाहा VIDEO

याबाबत अधिक माहिती अशी की, पटना (Bihar) येथील बिहटा प्रखंड येथील एका विद्यालयातील असून तेथील मुख्याध्यापिका आणि सहाय्यक शिक्षिका यांच्यामध्ये वाद होता. त्यांच्यामध्ये एका गोष्टीवरून क्लासरूममध्ये वाद पेटला आणि शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच त्यांनी एकमेकांना मारायला सुरूवात केली. यामध्ये एका शिक्षिकेची आईसुद्धा दुसऱ्या शिक्षिकेला चप्पलेने मारहाण करताना दिसत आहे. (Latest Marathi News)

Viral Video Bihar
Bhandara News : लाखांदूर तालुक्यातील 'या' गावात दीड महिन्यांपासून कृत्रिम पाणीटंचाई; प्रशासन मार्ग काढेल का ?

शाळेतील वर्गात सुरू झालेली ही लढाई शाळेच्या पाठीमागे असलेल्या शेतापर्यंत जाऊन पोहोचली. दोघीही एकमेकांचे केस ओढून चप्पलेने, लाथेने, चापटेने मारताना करताना दिसत आहेत. तर काही महिला त्यांच्यातील वाद सोडवण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहेत. यादरम्यान गावातील काही तरूणांनी या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

या व्हायरल व्हिडिओवर (Viral Video) नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या असून कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे. तर काही जणांनी विद्यार्थ्यांचे चांगलेच मनोरंजन झाले म्हणत या व्हिडिओची खिल्लीही उडवली आहे.

दरम्यान, या घटनेबद्दल बोलताना शिक्षणाधिकाऱ्यांनी हा शाळेतील त्यांच्यामध्ये असलेला वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांच्याकडे या मारहाणीबद्दल स्पष्टीकरण मागितले असून उच्च अधिकाऱ्यांनाही या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com