Inspiring News : बाळाच्या संगोपनासाठी तरुणानं नोकरी सोडली; स्तुत्य पाऊल, सोशल मीडियावर पोस्ट होतेय व्हायरल

pune youth switch job : बाळ झाल्यावर मुलींच्या करिअरला ब्रेक लागतो. पण हा ब्रेक पत्नीनेच का घ्यावा, असा मोठा विचार करत एका तरुणाने आपल्या नोकरीचा राजीनामा दिलाय. ही गोष्ट आहे पुण्यात जुनी सांगवी येथे राहणाऱ्या प्रवीण शिंदे याची.
pune youth Pravin Shinde switch job
pune youth Pravin Shinde switch jobFacebook
Published On

सोनाली शिंदे, साम टीव्ही

Pune youth switch job :

"बाळाला जन्म देण्याचा निर्णय आई आणि वडील दोघांचा असतो. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर त्याची पूर्ण जबाबदारी केवळ आईवर पडणे हा आईवर अन्याय आहे. त्याचा तिच्या करिअरवरही वाईट परिणाम होतो." असं म्हणत त्याने आपली नोकरी सोडण्याचा कारण सोशल मीडियावरही जाहीर केलेय. प्रवीणच्या या निर्णयाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"माझ्या जोडीदाराने आई म्हणून पहिल्या टप्प्यात बाळाला ९ महिने पोटात वाढवणं, ६ महिने अंगावर पाजण्यापासून सगळ्या गोष्टी करत पहिल्या टप्प्यातील तिची जबाबदारी पार पाडली आहे. तिने पहिल्या टप्प्यातील तिची जबाबदारी पार पाडल्यानंतर आता वडील म्हणून दुसऱ्या टप्प्यात मी बाळाच्या संगोपनातील (child care) जबाबदारी घेत आहे." , अशी पोस्ट त्याने केली आहे.

विशेष म्हणजे प्रवीणचा पगार हा त्याची पत्नी प्रियांका हिच्यापेक्षा अधिक असताना त्याने हा निर्णय घेतलाय. तिचा पगार कमी आहे कारण तो या व्यवस्थेचा दोष आहे, असं त्याचं म्हणणं आहे. आजही पुरुष आणि स्त्री यांच्या पगार वाढीच्या व्यवस्थेत दोष असल्याचं त्याचं म्हणणं आहे. अर्थात पत्नीच्या करिअरमधले (career) चढउतारही तो यासाठी गृहीत धरतो. प्रवीण हा एका ख्यातनाम वृत्तपत्राच्या डीजीटल विभागात डेप्युटी कॉपी एडीटर म्हणून काम करत होता, तर त्याची पत्नी प्रियांका एका सामाजिक संस्थेत काम करते.

pune youth Pravin Shinde switch job
Government Scheme For Youth: तरुणांना व्यावसायिक बनण्याची संधी, सरकारच्या 'या' योजनांचा घ्या फायदा

पती-पत्नीच्या संसारात सगळ्यात मोठा भाग असतो तो कुटुंबाचा. अर्थातच या निर्णयाला प्रवीणच्या किंवा प्रियांकाच्या कुटुंबीयांचा प्राथमिक विरोध असणं साहजिक आहे. पण ते परंपरेचे वाहक असून आपण आपल्या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे, असे त्याचे मत आहे. प्रवीण मूळचा नगरच्या संगमनेर तालुक्यातील देवगावचा आहे.

प्रवीण आणि प्रियांका यांनी मोठ्या धाडसाने हा निर्णय घेतलाय. आता त्यांना आर्थिक गरजा भागवताना काहीसा ताणही येणार आहे. दीड वर्षांनी पुन्हा नोकरी सुरू करण्याचा प्रविणचा मानस आहे. आता त्यांचे मूल सहा महिन्यांचे आहे. दीड वर्षांनी मूल थोड मोठं झाल्यावर ते दोघेही पाळणा घराची मदत घेणार आहेत. त्यांच्या या धाडसाचे आणि समतेच्या निर्णयाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.

pune youth Pravin Shinde switch job
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अधिसूचनेला OBC संघटनेचा विरोध, उच्च न्यायालयात याचिका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com