Viral Video : पुण्यात मुसळधार पावसाने रस्ते जलमय; दुचाकीसह चालक गेला वाहून, घटनेचा VIODEO व्हायरल

Pune Rain News : प्रदूषण वाढल्याने अनेक सखल भागात अजूनही पाणी साचलेलं आहे. अशात पावसातील काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. पाण्यात गेलं पुणे शहर.
Viral Video
Viral VideoSaam TV

पुण्यात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे काल पुण्यातील अनेक सखल भागांत पाणी साचलं होतं. येथील पावसामुळे नागरिकांची मोठी धांदळ उडाली आहे. प्रदूषण वाढल्याने अनेक सखल भागात अजूनही पाणी साचलेलं आहे. अशात पावसातील काही व्हिडिओ देखील समोर आले आहे.

Viral Video
Pune Rain Update News : पुण्यात आज पुन्हा पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी

पावसाच्या व्हायरल व्हिडिओंमध्ये एका तरुण पाण्यात वाहून गेल्याचं दिसत आहे. हा तरुण आपल्या दुचाकीवर बसलेला असताना दुचाकी सकट वाहून गेल्याचं दिसत आहे. काल सलग तीन तास पाऊस पडल्याने रस्त्यावर मोठं पाणी साचलं होतं. हे पाणी इतकं होतं की रत्यावर नदी वाहतेय की काय असं चित्र दिसत होतं.

त्यात एक दुचाकीस्वार रस्त्याने जात होता. पाणी जास्त असल्याने तो हाताने दुचाकी ढकलत नेत होता. तितक्यात त्याची दुचाकी स्लिप झाली आणि पाण्यातील प्रवाहासह पुढे वाहू लागली. दुचाकी वाहुन जाऊनये म्हणून तो देखील दुचाकी धरून राहिला. मात्र हा व्यक्ती देखील पाण्यात वाहून चालला आहे, असं चित्र व्हिडिओत दिसत आहे. पद्मावती भागात ही घटना घडलीये.

पुण्यात आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचे असणार आहेत. पुणे शहरासह राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा वेध शाळेचा अंदाज आहे.

पुण्यात आज आणि उद्या शहरात संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसू शकतो. काल देखील संध्याकाळच्या सुमारास पुण्यात पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती. राज्यात मुंबईसह पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पुणे वेधशाळेकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Viral Video
Pune Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने भलेमोठे झाड कोसळले, ५ घरे जमीनदोस्त; चिमुकलीसह वृद्ध दांपत्य जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com