Pune Garba King Video : गरबामुळे हार्ट अटॅकचा धोका? मुलासोबत खेळता खेळता अचानक गेला जीव, VIDEO
पुणे : नवरात्रोत्सवानिमित्त सध्या सर्वत्र गरब्याची धूम सुरु आहे. अगदी शहरापासून ते गावापर्यंत दांडीयाचं आयोजन केलं जातंय. मात्र गरबा कार्यक्रमातील काही घटना चिंता वाढवणारी आहे. गरबा खेळता-खेळता एका प्रशिक्षकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय. पुण्यातील चाकण परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्याच्या राजगुरुनगर शहरातील स्वराज्य मित्र मंडळाचे गरबा प्रशिक्षक अशोक माळी मुलासोबत गरबा खेळत होते. खेळता-खेळता ते अचानक कोसळले. काळजाचा ठोका चुकवणारे हे दृश्य नीट पाहा...
अशोक माळी यांना त्वरीत डॉक्टरांकडे नेण्यात आलं. मात्र त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचे घोषित करण्यात आले. अशा वेळी काय काळजी घ्यावी याबद्दल हृदयविकार तज्ज्ञ यांनी मार्गदर्शन केलं आहे.
काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यातही अशीच घटना घडली होती. दांडीया किंग लखन वाधवानी या २६ वर्षांचा तरुण खेळताना अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने कोसळला. डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलं. हार्ट अटॅक कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला येऊ शकतो. हृदयविकाराची काही लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. उत्साहाच्या भरातील खेळणे जीवावर बेतू शकतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.