Coldplay Concert Viral Video : कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्येच मैत्रिणीला केला प्रपोज; व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Viral Video On Coldplay Concert: मुंबईतील कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये वीकेंडला एका महिलेने अविस्मरणीय क्षण अनुभवला, जेव्हा तिच्या प्रियकराने संपूर्ण प्रेक्षकांच्या समोर तिला लग्नासाठी प्रपोज केले.
 Viral Video
Viral Video saam tv
Published On

प्रेम. या दोन-अडीच अक्षरांतच सगळं आलं. प्रेम अथांग समुद्रासारखा...कुठेच अंत नाही. प्रेम आंधळं असतं असं काही म्हणतात, तर प्रेमाला सीमा नसते असंही बोललं जातं. इतक्या इतक्या प्रेमकहाण्या आहेत, त्या कथांमधून अजरामर झाल्यात. हेच प्रेम प्रत्यक्षात जगता आलं तर तो अनुभव काही औरच! अथांग समुद्रासारखं हे प्रेम 'जनसागरात' मिळालं तर ते क्षण अविस्मरणीय. असंच काहीसं घडलंय कोल्डप्लेच्या कॉन्सर्टमध्ये. एका प्रेमीयुगुलानं हे क्षण अनुभवलेत. अवघं जग एकीकडं अन् यांचं प्रेम एकीकडं. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये रंगलेल्या या 'प्रेमाच्या खेळाचा' व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय.

नवी मुंबईचं काय तर, मुंबई, ठाणे आणि आजूबाजूच्या महानगरांमध्ये कोल्डप्ले कॉन्सर्टचं वारं घुमत होतं. अवघी तरुणाई या कोल्डप्ले कॉन्सर्टच्या प्रेमात होती. कॉन्सर्टवरचं हे प्रेम नवी मुंबई परिसरात फुलत असतानाच एका प्रेमकहाणीला तिथं अंकुर फुटले होते. स्टेडियममध्येच एका तरुणानं आपल्या प्रेयसीला प्रप्रोज केला. या प्रेमीयुगुलासाठी हे क्षण अविस्मरणीयच ठरले. हा क्षण अनेकांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात साठवून घेतला. प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्या वाजवून जणू या जोडप्याच्या प्रेमाला उत्स्फूर्त दाद दिली. या सुमधूर क्षणांचे हजारो प्रेक्षक साक्षीदार झाले. या क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 Viral Video
Viral Video: ट्रेनमध्ये 'गरम चहा' बनवण्याची अनोखी आयडिया, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा व्हायरल VIDEO

या गोड क्षणांचा व्हिडिओ आदिती बार्दिया यांनी एक्सवर शेअर केला आहे. तो तरूण आपल्या मैत्रिणीला प्रपोज करत असतानाच, दुसरीकडं ख्रिस मार्टिन हा भारताचा क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह याच्याबद्दल भरभरून बोलत होता. त्याचा व्हिडिओही कॉन्सर्टमध्ये लावण्यात आला होता. हा प्रेमाचा क्षण आणखी हिट ठरू शकला असता, असं या तरुणीला वाटतंय. आदिती यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओची आता तुफान चर्चा होतेय. या व्हिडिओवर प्रेमवीरांसह तरुणाईकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

अन् ती 'येस' म्हणाली...

कॉन्सर्टमध्ये ख्रिस मार्टिन 'ए स्काय फुल ऑफ स्टार्स' हे सुपरहिट गाणं गात होता. इतक्यात तो मध्येच थांबला. याशिवाय तो फुल कॉमेडीच्या मूडमध्ये होता. गाणं लवकर लवकर आटोपायला लागेल, कारण बुमराह क्रिकेटसाठी बॅकस्टेजला वाट पाहतोय, असं ख्रिस म्हणाला. या ह्युमरवर प्रेक्षकांमध्ये हास्यलाट पसरली.

ख्रिस मार्टिन हळूहळू प्रेक्षकांमध्ये मिसळत होता. कधी गाणं, कधी ह्युमर असं वातावरण त्यानं तयार केलं होतं. स्टेजवर तर तो चक्क हिंदीत बोलू लागला. आप सबका स्वागत है असं म्हणत त्यानं प्रेक्षकांना अदबीनं विचारपूस केली. मुंबई में आकर हमें बहोत खुशी हो रहीं हैं! असं सांगताना त्याचा आनंद आकाशात मावेनासा झाला होता.

 Viral Video
Viral Video: जबरदस्त! "लल्लाटी भंडार" गाण्यावर रस्त्यावर भन्नाट डान्स, व्हायरल VIDEOने नेटकऱ्यांची मनं जिंकली

अवघा प्रेक्षकवर्ग मार्टिनच्या आवाजानं मंत्रमुग्ध होऊन गेलेला असतानाच, अचानक एक व्यक्ती स्पॉटलाइटमध्ये आली. ती गुडघ्यावर बसली होती. एका हातात अंगठी होती. त्यानं अचानक मैत्रिणीला अंगठी घालत प्रपोज केला. त्यावर तिनंही होकार दिला. हा सगळा प्रेमस्पर्शी क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून प्रेमळ प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.

 Viral Video
Viral Video: राजस्थानी मुलांचा हटके स्वॅग, घरात एकटे असताना नेमकं काय करतात? व्हायरल VIDEO पाहून म्हणाल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com