Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Petrol at ₹45 Per Litre: तुमच्याकडे गाडी असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे...कारण, आता पेट्रोल 45 रुपये लिटर होणार असल्याचा दावा कऱण्यात आलाय...सरकारने दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...पण, खरंच पेट्रोल स्वस्त होणार आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Viral message claims petrol will be ₹45/litre—our investigation says it's fake.
Viral message claims petrol will be ₹45/litre—our investigation says it's fake.Saam Tv
Published On

पेट्रोलचे दर आता कमी होणार असा दावा करणारा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय...त्यामुळे वाहन चालकांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे...कारण, पेट्रोलचे दर काही महिन्यात वाढल्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला खात्री लागलीय...त्यातच आता हा दावा केल्यामुळे थोडासा दिलासा मिळणार आहे...पण, मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

लवकरच पेट्रोल 45 रुपये प्रति लिटर होणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केलीय. सध्या पेट्रोलचा दर प्रति लिटर 100 ते 103 रुपये इतका आहे. मात्र, लवकरच दर कमी होणार आहेत.

हा मेसेज व्हायरल झालाय खरा पण, अशी कुठेही चर्चा नाही...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...पेट्रोलच्या गाड्या वापरणारे कोट्यवधी लोक आहेत...त्यामुळे याची सत्यता जाणून सत्यता सांगणं गरजेचं आहे...आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत पेट्रोलच्या किंमती कमी करण्याबाबत सरकार विचार करतंय का...? अशी घोषणा सरकारने केलीय का...? याबाबत माहिती मिळवली...तसंच याबाबत एक्सपर्टकडूनही माहिती घेतली...

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

पेट्रोलचे दर कमी होणार असल्याचा दावा खोटा

पेट्रोल लिटर 45 रुपये होणार अशी मोदींनी घोषणा केली नाही

सोशल मीडियावरून चुकीचा मेसेज व्हायरल

सध्या पेट्रोलचे दर 100 रुपये लिटर इतके आहेत...मुंबई-पुण्यात 103 रुपये पेट्रोलचा दर आहे...मात्र, पेट्रोलचा दर आता 45 रुपये होणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com