अयोध्येत नुकतीच रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली आहे. सर्वच रामभक्त आता श्री रामप्रभुचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत हजेरी लावत असल्याचं समोर आलं आहे. अयोध्येत मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. फक्त देशातच नाही तर विदेशात देखील रामनामाचा गरज होत आहे. असाच एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर फिरत (Ram Bhajan In Flight) आहे. त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ या. (latest viral videos)
इंटरनेटवर एक व्हिडिओ फिरत आहे. त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. नक्की या व्हिडिओमध्ये आहे तरी काय, असा सवाल तुम्हालाही पडला आहे का? हा एका विमानातील व्हिडिओ (Flight Viral Video) आहे. उडत्या विमानात काही प्रवासी रामनामात दंग झाल्याचं पाहायलं मिळतंय. ते मोठ्या आनंदाने ढोलक वाजवत रामभजन करत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
विमानात गायलं राम भजन
हवेत उडणाऱ्या विमानात तुम्ही कधी भजन-कीर्तन अनुभवलं आहे का? नुकतीच अशीच एक अनोखी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये काही प्रवासी फ्लाइटमध्ये बसून राम भजन (Ram Bhajan) गात आहेत. जमीन, पाणी, हवा या तिन्ही ठिकाणी आता रामनामाची धून ऐकायला मिळतेय.
प्रवाशांनी विमान प्रवासाला अध्यात्मिक अनुभवात रुपांतरीत केलंय. विमानातील सर्व प्रवाशांनी मिळून ‘रघुपती राघव राजा राम’ हे भजन गायलं आहे. प्रवासी भक्तीभावाने न्हाऊन निघाले आहेत. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. घटनेचा हा व्हिडिओ (Ram Bhajan Video) सोशल मीडियावर चांगलाच चर्चत आलाय. युजर्सकडून याचं कौतुक होत आहे.
रामभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण
अयोध्येत राम मंदिराचं (Ram Mandir) लोकार्पण झाल्यापासून सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. जानेवारी महिन्यात हा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. त्यानंतर रामलल्लाच दर्शन भाविकांसाठी खुलं झालं आहे. आता विमानातही (flight) रामनामाचा जप झाल्याचं पाहायला मिळतंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.