वाशी रेल्वे स्टेशनवर (Vashi Station) प्रवासी लोकल ट्रेनला धक्का देताना दिसत आहे. आतापर्यंत आपण दुचाकी, चारचाकी किंवा मोठ्या गाड्यांनी धक्का दिल्याच्या घटना ऐकल्या आहेत. नवी मुंबईत पहिल्यांदाच ट्रेनला धक्का दिल्याची घटना घडली (Navi Mumbai Viral Video) आहे. प्रवाशांनी रेल्वेला धक्का का दिला, हे आपण जाणून घेऊ या. (latest viral videos)
वाशी स्टेशनवर प्रवाशांनी खाली रेल्वे रूळावर अडकलेल्या माणसाला वाचवण्यासाठी लोकल ट्रेनच्या डब्याला धक्का दिला आहे. ही घटना एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर फिरत आहे. तो मोठ्या प्रमाणात व्हायरल (Train Viral Video) झाला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रवाशांनी लोकल ट्रेनला धक्का दिला
ही घटना बुधवारी घडली आहे. हा व्हिडिओ वाशी स्थानकावरील आहे. व्हिडिओमध्ये लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनजवळ लोकांचा एक गट जमलेला दिसत आहे. तर, दुसरा मोठा गट एका प्रवाशाला वाचवण्याचा प्रयत्न करत जड रेल्वे कोचला बाजूला ढकलताना (Push Local Train Coach) दिसत आहे.
बुधवारी दुपारी वाशी रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या एकतेचं कृत्य दाखवणारा व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे. ट्रेनखाली अडकलेल्या दुसऱ्या सहप्रवाशाची सुटका करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला आहे. तिथे असलेल्या प्रवाशांनी लोकल ट्रेनला धक्का दिल्याचं धाडसी कृत्य व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर पसंती (Viral Video) मिळत आहे.
रेल्वे विभागाचं प्रवाशांना आवाहन
भारतीय रेल्वे विभागाने अहवालाद्वारे या घटनेची माहिती दिली आहे. तो माणूस रेल्वे (Local Train) रूळावर कसा अडकला, याची चौकशी केली आहे. तसंच प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आणि रेल्वे स्थानकांवर फूटओव्हर ब्रिज आणि अंडरपासचा वापर करण्याचा इशारा दिला (Push Local Train At Vashi Station) आहे. प्रवाशांना सुरक्षितता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
रेल्वे स्टेशनवर नेहमीच विचित्र प्रकार घडत असतात. गोंधळ, रेल्वेत होणारी प्रवााशांची भांडणे हा तर नेहमीचाच विषय झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.