मुंबईची लोकल ट्रेन लाखो लोकांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो नागरिक लोकल ट्रेनचा वापर करतात. सर्वसामान्य नव्हेच तर अब्जाधीशांना देखील लोकल अडचणीच्या वेळी मदत करते. अशी एक घटना समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
देशातील प्रसिद्ध उद्योगपती निरंजन हिरानंदानी यांनी नुकसात मुंबईतील लोकल ट्रेनमधून प्रवास केला. वेळ वाचवण्यासाठी त्यांनी हा प्रवास केला. 73 वर्षीय हिरानंदानी यांनी मुंबईहून उल्हासनगरला जाण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर केली. त्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इंस्टाग्राम (Social Media)अकाऊंटवर शेअर केला आहे.
व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, वेळ वाचवण्यासाठी आणि ट्रॅफिकपासून सुटका मिळवण्यासाठी आज मुंबई लोकलने प्रवास केला. मुंबई ते उल्हासनगर दरम्यान एसी लोकलने प्रवास केली. खूप चांगला अनुभव होता. (Viral Video)
हिरानंदानी यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावर अनेक कमेट्सही येत आहे. काहीजण याला प्रेरणादायी म्हणत आहेत तर काही जण टीकाही करताना दिसत आहेत. ट्रेनमध्ये बसल्यावर ते काही प्रवाशांसोबत संवाद साधताना देखील दिसत आहेत.
निरंजन हिरानंदानी हे हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आहेत. हिरानंदानी ग्रुपचे ते संस्थापक देखील आहेत. देशातील अनेक भागात त्यांचे प्रोजेक्ट सुरु आहेत. जून 2021 पर्यंत, फोर्ब्सच्या यादीत निरंजन हिरानंदानी यांचा भारतातील 100 सर्वात श्रीमंत लोकांमध्ये समावेश होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.