दक्षिण आफ्रिकाच्या मोरोक्को येथे ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा मोठा भूकंप (Earth quake) झाला. जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, गेल्या १२० वर्षातील हा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे. तर या भूकंपाचा केंद्रबिंदू भूपृष्ठापासून १८ किलोमीटर खाली होता. भूकंपात आतापर्यंत ६३२ जणांचा मृत्यू झालाय. परंतु दैव बलवत्तर असेल तर यमदेवालाही माघारी जावं लागतं. याचा प्रत्यय या व्हिडिओतून आला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक चिमुकला दबला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
या मुलाला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. चौधरी परवेझ नावाच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. व्हायरल झालेला व्हिडिओ हा मोरोक्को येथील असल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान भूकंपग्रस्त भागातील वीजप्रवाह खंडीत झालाय. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार शुक्रवारी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी भूकंप आला.
मोरोक्कोच्या अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो देखील पोस्ट केली आहेत, ज्यामध्ये इमारती कोसळल्यानंतर धुळीचे ढग पाहायला मिळत आहेत. दरम्यान, मोरक्कोमधील या भूकंपामुळे संपूर्ण देशभरातून भावनिक प्रतिक्रिया येत आहेत.
मोरोक्कोमध्ये भूकंप आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे जीवित आणि आर्थिक हानी झालीय. त्यांच्या या दु:खाच्या काळात माझी संवेदना मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. जखमी झालेले लवकर बरे व्हावेत. त्यांच्या या कठीण वेळी भारत मोरोक्कोला शक्य असेल ती मदत करण्यास तयार आहे, असं पंतप्रधान मोदींनी एक्स या सोशल साईटवर(आधीच्या ट्विटरवर) दु: ख व्यक्त करताना म्हटलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.