Viral Video : पावसाळा आला अनेकवेळा निसर्गाचा रुद्रावतार पाहायला मिळतो. सध्या देशाच्या अनेक भागात पूराना हाहाकार माजवलाय. पाऊस किती धोकादायक बनू शकतो, हे सध्या उत्तर भारतातील नागरिक अनुभवत आहेत. पावसाळ्याच वीज पडल्यानेही दरवर्षी अनेकजण दगावतात. वीज पडतानाचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पावसाळ्यातील सर्वात मोठा धोका म्हणजे वीज पडण्याचा असतो. ज्यामुळे कधीही कोणाचाही मृत्यू होऊ शकतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसणारे दृश्यही खूप भयावह आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर वाहने ये-जा करताना दिसत आहेत. मात्र अचानक वीज जमिनीवर पडते आणि मोठा स्फोट होतो. हा स्फोट इतका जोरदार होता की कोणीतरी बॉम्ब फेकल्यासारख दिसतंय.या वीजेची तीव्रता किती असेल याचा अंदाज तुम्हाला व्हिडीओ पाहून येऊ शकतो.
त्यावेळी एखादी वस्तू किंवा व्यक्ती तिथे असती तर त्याचे काय झाले असते, याचा विचारही करवत नाही. हा व्हिडीओ कुठला आहे, याची कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नाही. या घटनेत कोणाला इजा झाली की नाही याचीही माहिती मिळालेली नाही. (Latest Marathi News)
विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु असल्यास नागरिकांना खबरदारी घेण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. कारण वीज पडून लोकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे. विजांचा कडकडाट पाऊस पडत असल्यास झाडाखाली आडोसा घेणे टाळले पाहिजे, तज्ज्ञ देखील असाच सल्ला देतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.