प्रयागराजमध्ये माकडाने वकिलाची ५० हजार रुपयांची बॅग पळवली
झाडावर चढून माकडाने नोटा हवेत उडवल्या
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
टोपीवाल्याची गोष्ट आता “बॅगवाल्या माकडाने” खरी करून दाखवली
माकडाने टोपी विकणाऱ्याच्या टोप्या पळवल्याची गोष्ट लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत. आता मात्र ही गोष्ट सत्यात उतरली असून टोपीच्या ऐवजी माकडाने वकिलाची ५० हजारांची बॅग पळवली. त्यानंतर झाडावर बसून माकडाने नोटांचा वर्षाव केला. या माकडाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. शिवाय व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील सोरावमध्ये घडली आहे. एका वकिलाने प्रयागराज येथील आझाद सभागृहासमोर त्याची बाईक उभी केली. बाईक उभी करून त्याने काही महत्त्वाची कागदपत्रं आणि नोटांचे बंडल बाईकच्या डिकीमध्ये ठेवले. अचानक एक माकड तिथे आला. त्याने हुशारीने डिकी उघडली त्यातून पैशांची बॅग काढली आणि कागदपत्रं तशीच ठेवली. त्यानंतर तो जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडावर चढला.
झाडावर चढताच माकडाने बॅग फाडली. त्यातून पैसे काढलेया, त्याचा रबरबँड काढला आणि नोटा खाली फेकू लागला. अचानक ५०० रुपयांच्या नोटा हवेत उडू लागल्या. हे दृश्य पाहून उपस्थित असलेले लोक हैराण झाले. जमा झालेल्या उपस्थितांमध्ये हशा पिकला, तर काही जण नोटा घेण्यासाठी धावले. यादरम्यान परिसरात एकच गोंधळ उडाला.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, माकड झाडाच्या फांदीवर बसून ५०० रुपयांच्या नोटा खाली टाकत आहे. खाली असलेले लोक ओरडू लागले, तेव्हा त्याने नोटा हवेत फेकल्या आणि पळून गेला. वकिलाला काय घडलं हे समजेपर्यंत माकडाने नोटा हवेत उडवल्या होत्या. जमावांपैकी कोणीतरी याचा व्हिडीओ काढला आणि आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.