Mom Desi Jugaad: वहा रे माँ! ट्रेनच्या गर्दीत आईनं बाळासाठी शोधली स्पेशल सीट; देसी जुगाड VIDEO पाहून खळखळून हसाल

Mumbai Local Train Mom Jugaad For Baby: ट्रेन ५ ते ७ मिनीटे अशिराने आली की गर्दी आणखीन वाढते. कधीकधी ही गर्दी इतकी जास्त असते की अगदी श्वास घेण्यासही जागही उरत नाही.
Mom Desi Jugaad
Mom Desi JugaadSaam TV
Published On

Viral Video:

मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन म्हणजे एक लाईफलाईनच. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून मुंबई लोकल ट्रेनला ओळलं जातं. ट्रेनमध्ये नेहमीच प्रचंड गर्दी असते. या गर्दीमधून मुंबईकर आपली वाट काढत रोज धकाधकीचं जीवन जगतात. अशा गर्दीत एक महिला आपल्या बाळाला घेऊन आली होती. सर्व सीट्स फूल होत्या त्यामुळे या आईने देसी जुगाड करत आपल्या बाळासाठी स्पेशल सीट शोधली.

Mom Desi Jugaad
Viral Video: ऑस्ट्रेलियन फॅनवर चढला इंडियन फिव्हर! पाकविरूद्धच्या सामन्यात दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा; Video

ट्रेनमध्ये वर्कींग डे असताना प्रचंड गर्दी असते. ट्रेन ५ ते ७ मिनीटे अशिराने आली की गर्दी आणखीन वाढते. कधीकधी ही गर्दी इतकी जास्त असते की अगदी श्वास घेण्यासही जागही उरत नाही. अशाच प्रकारे प्रवाशांनी तुडूंभ भरलेल्या ट्रेनमध्ये एक महिला लहान बाळाला घेऊन येते.

ट्रेन पूर्ण भरलेली असते त्यामुळे बाळाला बसण्यासाठी एकही सीट शिल्लक नसतं. आता एवढ्या गर्दीत बाळाला किती वेळ उभं ठेवणार म्हणून आई बाळाला थेट बॅग्स ठेवण्यासाठी असलेल्या रॅक्समध्ये बसवते. चिमुकलं बाळ सुद्धा अगदी आरामत वरती बसून घेतं. येथे बसून खाली असलेल्या गर्दीची पाहून बाळालाही फार मज्जा वाटते.

व्हिडीओमध्ये तुम्हीही पाहू शकता की, बाळाने मस्त आरामात वरती बसून घेतलंय. @mumbaiguide_ या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्यात. हे फक्त एक आईच करू शकते, असं एकाने म्हटलंय. तर काहींनी बाळाची काळजी व्यक्त केलीये. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Mom Desi Jugaad
Ahmednagar Crime: धक्कादायक! रात्रीच्या अंधारात ती तरुणाशी बोलत होती; काकानं पाहताच कुऱ्हाडीचा वार, पुतणीची हत्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com