Man Married With Crocodile: मंडप सजला, वरात निघाली, महापौरांच्या दारी मगर नवरी बनून आली - VIDEO

Viral Video: एका पठ्ठ्याने तर चक्क मगरीशी चक्क केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
man married with crocodile
man married with crocodile twitter
Published On

Man And Crocodile Marriage: सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यात लग्नाच्या व्हिडिओचा देखील समावेश असतो. व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी कोण काय करेल याचा काहीच नेम नसतो. प्रत्येकाला वेगळं काहीतरी करायचं असतं. मेक्सिकोतील एका पठ्ठ्याने तर चक्क मगरीशी चक्क केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

man married with crocodile
ICC World Cup 2023 Tickets: वर्ल्डकप स्पर्धेची तिकीटं अशी करा बुक; कुठे मिळतील, काय असेल किंमत?

मेक्सिकोतील सॅन पेड्रो हुआमेल्युलाचे महापौर कार्टर ह्यूगो यांनी चक्क मगरीसोबत विवाह केला आहे. त्यांचा हा विवाह सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय. या विवाह सोहळ्यात हजारो लोकांनी हजेरी लावली होती. हा विवाह सोहळा चाली रितीनुसार पार पडला. या सोहळ्याचे आयोजन मानव आणि प्राणी यांच्यातील चांगले संबंध टिकून राहावे यासाठी केले जाते. (Man Married With Crocodile)

असं करणं इथे सामान्य गोष्ट आहे. स्थानिकांची अशी भावना श्रद्धा आहे की, असं केल्याने देवाकडून जे हवं आहे ते मिळवता येईल. इथले लोक भरपूर पाऊस पडण्याची मागणी करत असतात. (Viral Video)

मगरीसोबत विवाह करण्याची प्रथा..

मगरीसोबत विवाह करणं ही मेक्सिकोतील जुनी प्रथा आहे. असं म्हटलं जातं की, ही प्रथा १७८९ पासून सुरु आहे. हा सोहळा विधी परंपरेनुसार पार पाडला जातो. सुरुवातीला मगरीचं नामकरण केलं जातं. त्यानंतर विवाह करण्यासाठी तारीख ठरवली जाते.

या विवाह सोहळ्यासाठी नातेवाईक आणि स्थानिकांना आमंत्रण दिलं जातं. त्यानंतर सर्वांसमोर हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडला जातो. असं म्हटलं जातं की, मगरीसोबत विवाह केल्याने स्थानिक लोकांचं भलं होतं.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ आताचा नसून जुलै २०२२ चा असल्याचं म्हटलं जात आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com