Viral Video: सुसाट गाड्या, पैशांचा पाऊस अन् हुल्लडबाजी, पोलिसांनी तरुणांची अशी उतरवली मस्ती; VIDEO व्हायरल

Man Throws Cash From Running Car Noida Viral VIdeo: या व्हिडिओमध्ये नोएडाच्या रस्त्यावर रेंज रोव्हर या आलिशान कारमधून प्रवास करणारे काही तरुण कारच्या खिडकीतून नोटांची उधळण करताना दिसत आहेत.
Man Throws Cash From Running Car Noida Viral VIdeo
Man Throws Cash From Running Car Noida Viral VIdeoSaamtv
Published On

Viral Video News:

बाईक, कार चालवताना भलती स्टंटबाजी करण्याची काही लोकांना फार हौस असते. अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी, फेमस होण्यासाठीही तरुण- तरुणी अनेक स्टंट करत असतात. माध्यमांवर अशा स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एक तरुण धावत्या कारमधून पैशांच्या नोटा उधळताना दिसत आहे.

राजधानी दिल्लीमधील (Delhi) नोएडामध्ये रस्त्यावर धावत्या कारमधून नोटा उडवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडिओमध्ये नोएडाच्या रस्त्यावर रेंज रोव्हर या आलिशान कारमधून प्रवास करणारे काही तरुण कारच्या खिडकीतून नोटांची उधळण करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ सेक्टर-20 मधील असल्याचे सांगण्यात येत आहे. सुसाट रेंज रोव्हर कारमध्ये बसलेला एक तरुण या नोटा उडवत आहे. तर स्कॉर्पिओमध्ये स्वार असलेले काही लोक हा व्हिडिओ बनवताना दिसत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Man Throws Cash From Running Car Noida Viral VIdeo
Ajit Pawar News: निवासी डॉक्टरांच्या मागण्यांना मंत्रीमंडळ बैठकीत मंजुरी देणार: उपमुख्यमंत्री अजित पवार; निवासी डॉक्टर संपावर कायम

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर (Viral Video) नोएडा पोलिसांनी आता त्यावर मोठी कारवाई केली आहे. नोएडा ट्रॅफिक पोलिसांनी रेंज रोव्हर चालवणाऱ्या व्यक्तीवर वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

पोलिसांनी त्याला 21 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी अशा हुल्लडबाजांना कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तसेच काही जणांनी पोलिसांच्या या धडक कारवाईचे कौतुक केले आहे. (Latest Marathi News)

Man Throws Cash From Running Car Noida Viral VIdeo
High Court : मोठी बातमी! मणिपूरमध्ये या आदेशामुळे भडकला होता हिंसाचार; हायकोर्टाने तो निर्णयच केला रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com