Viral Video : स्कुटी ढकलत जात होता, अचानक कोसळला; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल

Madhya Pradesh Indore Viral Video : इंदूरमध्ये चालता चालता कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून मृत्यूचे नेमके कारण समोर येण्यासाठी तपास सुरू आहे.
Viral Video : स्कुटी ढकलत जात होता, अचानक कोसळला; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
Madhya Pradesh Viral VideoSaam Tv
Published On
Summary
  • इंदूरमध्ये २७ वर्षीय तरुणाचा चालता चालता मृत्यू

  • सीसीटीव्ही फुटेजमुळे घटना व्हायरल

  • श्वास घेण्यास त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज

  • मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलिस तपास सुरू

  • स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाचा चालता चालता कोसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर तरुणांच्या हृदय विकाराच्या समस्यांसबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. संबंधित तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, व्हिडिओमध्ये तरुण त्याच्या स्कूटरवरून चालत जात असल्याचे आणि नंतर काही सेकंद थांबताना दिसत आहे. त्यानंतर तो जमिनीवर निपचित पडला आणि त्याचा मृत्यू झाला. तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे प्राथमिक अंदाजात म्हटले जात आहे.

Viral Video : स्कुटी ढकलत जात होता, अचानक कोसळला; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, व्हिडिओ व्हायरल
मोठी बातमी : मतदानाला २ दिवस शिल्लक असताना 'या' २ ठिकाणी निवडणुकीला ब्रेक, कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

मिळालेल्या माहितीनुसार , ही संपूर्ण घटना इंदूरच्या परदेसी पुरा पोलीस स्टेशन परिसरात घडली. एक २७ वर्षीय तरुण पंक्चर झालेली स्कुटी घेऊन गाडीची दुरुस्ती करण्यासाठी एका दुकानात जात होता. अचानक त्या तरुणाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि तो स्कूटरसह जमिनीवर कोसळला. त्या तरुणाला जमिनीवर पडलेले पाहून जवळच्या लोकांची गर्दी जमली. लोकांनी तातडीने त्या तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

तरुणाच्या मृत्यूनंतर, स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे, ज्यामध्ये तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान या तरुणच मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्यापही अस्पष्ट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com