संदीप चव्हाण, साम प्रतिनिधी
आता बातमी आहे तुमच्या आवडत्या मॅगीची. मॅगीत किडे आढळलेयत.होय, मॅगीत किडे आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय.देशभरात लाखो लोक मॅगी खातात. मात्र, व्हायरल होत असलेला व्हिडिओ खरा आहे का.? खरंच मॅगीत किडे आढळलेयत का.? याची आम्ही पडताळणी केली.मग काय सत्य समोर आलं पाहुयात.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मॅगी खाणं बंद कराल. हा व्हिडिओही तसाच आहे.या मॅगीत कीडे फिरताना स्पष्ट दिसतायत.2 मिनिटांत तयार होणारी मॅगी तुम्ही खाणार असाल तर नक्कीच आजारी पडू शकता. कारण, मॅगीत कीडे आढळल्याचा दावा करण्यात आलाय. हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होतोय.व्हिडिओ खरा आहे का. मॅगीत कीडे फिरणारे हा व्हिडिओ नक्की कुठला आहे.? हा आरोग्याशी खेळ होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.मात्र, त्या आधी हा व्हिडिओ नीट पाहुयात.
मॅगी नूडल्सची पॅकेजिंग तारीख मे 2024 आहे
मॅगीच्या पॅकेटची एक्सपायरी तारीख जानेवारी 2025 आहे
पाणी गरम करून त्यात मॅगी टाकली
पाण्यात नूडल्स टाकल्यानंतर कीडे पाण्यात तरंगू लागले
या मॅगीची एक्सपायरी डेटही संपलेली नाहीये. तरीदेखील मॅगीत कीडे आढळल्याचा दावा करण्यात आलाय.मॅगी ही लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच खातात. 2 मिनिटांत चटकन आणि पटकन नाष्टा म्हणजे मॅगी. जेवण बनवता येत नाही अशीही व्यक्ती मॅगी बनवून खाऊ शकते. त्यामुळे हा विषय सगळ्यांसाठीच महत्त्वाचा आहे...हा आरोग्याचा प्रश्न असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्यावेळी एका व्यक्तीनेच हा व्हिडिओ व्हायरल करून याची तक्रार राष्ट्रीय ग्राहक मंचाकडे केलीय.
मॅगीत किडे आढळल्याचा व्हिडिओ मध्य प्रदेशातील जबलपूरचा
मॅगीत किडे आढळल्याचा दावा अंकित सेंगरने केलाय
मॅगी गरम पाण्यात टाकल्यानंतर त्यात किडे दिसले
मॅगीत किडे दिसताच अंकित सेंगरेनं ग्राहक मंचात तक्रार केली
याआधी जून 2015 मध्ये मॅगीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात केमिकल असल्याच्या आरोपानंतर 6 महिन्यांसाठी बंदी घातली होती.आता मॅगीत किडे सापडल्याने पुन्हा मॅगी वादात आलीय...त्यामुळे अशी किडे असलेली मॅगी खाल्ल्याने आरोग्यास काय हानी पोहोचू शकते हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं.
किडे असलेले नुडल्स खाल्ल्याने पोटाचे विकार होतात
उलट्या, जुलाब, विषबाधा होऊ शकते
गंभीर आजार होऊ शकतात.
त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे निष्कृष्ट दर्जाची किडे असलेली मॅगी खाल्लात तर आजारी पडाल. यामुळे पोटाचे विकार यासोबत गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत मॅगीत किडे आढळल्याचा दावा सत्य ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.