Viral Video: ट्रेनमधील पँट्रीवाल्यांची गुंडगिरी! प्रवाशाला बेदम मारहाण; भांडण सोडवण्याऐवजी लोकांनी व्हिडिओ बनवला

Pantry Staff Beating Passenger in Sleeper Coach: स्लीपर कोचमध्ये पॅन्ट्री कर्मचाऱ्यांनी एका प्रवाशाला क्रूरपणे मारहाण केली. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे भारतीय रेल्वेमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Viral Video: ट्रेनमधील पँट्रीवाल्यांची गुंडगिरी! प्रवाशाला बेदम मारहाण; भांडण सोडवण्याऐवजी लोकांनी व्हिडिओ बनवला
Published On
Summary
  • ट्रेनच्या स्लीपर कोचमधील पँट्री कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला मारहाण केली.

  • एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

  • भांडण थांबवण्याऐवजी प्रवाशांनी व्हिडिओ बनवला

सोशल मीडियावर दररोज मारामारी आणि बाचाबाचीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, असाच एक व्हिडिओ रेल्वेच्या स्लीपर कोचमधील व्हायरल होत आहे. यावरून प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. व्हिडिओमध्ये पँट्री कर्मचाऱ्यांची गुंडेगिरी दिसत आहे. पँट्रीमधील कर्मचारी एका प्रवाशाला क्रूरपणे मारहाण करत असल्याचं दिसत आहे. प्रवाशाला मारहाण होत असताना डब्यातील इतर प्रवाशी त्यांचा वाद सोडवण्याऐवजी फक्त व्हिडिओ बनवण्यात गुंग दिसेल.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर @ashishgayakwad_mh_34_ नावाच्या अकाउंटवरून व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये काही पँट्री कर्मचारी स्लीपर कोचमध्ये एका प्रवाशाला घेरत त्याला मारहाण करत आहेत. प्रवाशाला मारहाण केली जात असताना डब्यात इतर प्रवासीही तेथे होते. पण कोणीही त्यांचा वाद सोडवत नाहीत उलट मारहाणीचा व्हिडिओ बनवण्या गुंग झालेल्याचं दिसत आहे.

अनेक लोक त्यांचे मोबाईल फोनवरून व्हिडिओ काढत आहेत. या घटनेमुळे रेल्वेच्या प्रवासी सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हा व्हिडिओ विदिशा आणि बिना दरम्यानच्या जीटी एक्सप्रेस ट्रेन १२६१५ चा असल्याचे सांगितले जात आहे. प्रवाशाला मारहाण होत असताना ट्रेनमधील इतर प्रवाशांनी मदत का केली नाही, असा प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर विचारत आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युझर लोकांनी आयआरसीटीसीला टॅग करत प्रवाशाला न्याय द्यावा अशी मागणी केली. जर अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई झाली नाही तर प्रवाशांचा रेल्वेवर विश्वास राहणार नाही. सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होतील. अनेक युजर दोषी पँट्री कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने टिप्पणी केली की, "ते एका गरीब माणसाला मारहाण करत आहेत, पोलीस त्याला कशासाठी संरक्षण देत आहेत?" दुसऱ्या एका युजरनं कमेंट केली, "इतके प्रवासी आहेत, पण सर्वजण मुके आणि बहिरे असल्याचे भासत आहे. उद्या तुमच्यासोबतही असेच घडू शकते." दुसऱ्या एका वापरकर्त्याने कमेंट केली, "हे पँट्री कर्मचारी गुंडांसारखे वागत आहेत. मात्र इतरजण फक्त व्हिडिओ बनवत आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com