Couple Viral Video : हैदराबादच्या पोलीस कपलचा सोशल मीडियावर धुमाकूळ, प्री-वेडिंग शूटची देशभर चर्चा; पोलीस आयुक्त म्हणाले...

Pre Wedding Shoot viral : ऑगस्ट महिन्यात हे जोडपं विवाह बंधनात अडकलं आहे.
Viral Video
Viral Video Saam TV
Published On

Police Couple Pre-Wedding Video :

लग्नाआधी प्री वेडिंग फोटोशूट, प्री वेडिंग व्हिडीओ शूट करणे एक ट्रेंड बनला आहे. वेगवेगळ्या थीमवर जोडपे आपल्या लग्नाआधीच प्री वेडिंग शूट करतात. असे अनेक प्री वेडिंग व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. सध्या हैदराबादच्या पोलीस जोडप्याचं प्री वेडिंग शूट चर्चेत आहे.

खाकी वर्दी, पोलीस गाड्या आणि हिरो-हिरोईनप्रमाणे जोडप्याची एन्ट्री... अगदी सिनेमात शोभावे असे सीन या जोडप्याने प्री वेडिंग शूट केले आहे. जवळपास २ मिनिटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हैदराबादच्या पोलीस आयुक्तांनी देखील या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  

Viral Video
Women Viral Video : रेल्वेत टीसीने विचारलं तिकीट कुठेय? महिलेच्या उत्तराने मन जिंकलं

के भावना (सब इन्स्पेक्टर) आणि रावुरी किशोर (सिटी आर्म रिझर्व्ह फोर्स) अशी या नव्या जोडप्याची नावे आहेत. ऑगस्ट महिन्यात हे जोडपं विवाह बंधनात अडकलं आहे. जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण जोडप्याने वर्दी आणि पोलीस व्हॅनच्या केलेल्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. (Latest News Update)

मात्र जोडप्याने याबाबत पोलीस विभागाकडून परवानगी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. जोडप्याचा व्हिडीओ रिट्विट करत हैदराबादचे पोलीस आयुक्त सीव्ही आनंद म्हणाले की, 'मला यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. दोघेही लग्नाबद्दल खूप उत्सुक दिसत आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे.  (Viral VIdeo)

Viral Video
Uttar Pradesh Accident : टवाळखोरांनी ओढणी खेचल्याने विद्यार्थिनीचा सायकलवरुन पडून मृत्यू, घटनेचा थरारक CCTV Footage समोर

पोलीस आयुक्तांनी पुढे म्हटलं की, दोघेही पोलीस अधिकारी आहेत. त्यामुळे पोलीस खात्याची मालमत्ता आणि चिन्हे वापरण्यात काहीही गैर वाटत नाही. आपल्यापैकी काहींना राग येत असेल, पण मला त्याला भेटून आशीर्वाद द्यायला आवडले असते. तरी मी इतरांना सल्ला देतो की योग्य परवानगीशिवाय हे असं काही करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com