Matchstick Factory Video : माचीसच्या काड्या कशा बनवतात माहितीये? पाहा फॅक्टरीतला व्हिडिओ

Matchstick Making Process Factory Video Viral : मशीनच्या सहाय्याने हे ओंडके बारीक कापलेत. त्यानंतर लाकडाला असलेली साल एका व्यक्तीने सोलून घेतली आहे. पुढची प्रोसेस खरंच भन्नाट आहे.
Matchstick Making Process Factory Video Viral
Matchstick Factory Video Saam TV

मेणबत्ती पेटवण्यासाठी किंवा अन्य काही कारणांसाठी माचीस प्रत्येकाच्या घरात असते. दिवा लावताना देखील आपण आजही माचीसचा उपयोग करतो. एक छोटीशी माचीसची काडी संपूर्ण अंधर दूर करून प्रकाश देते. मात्र तुम्हाला माहितीये का की हे माचीस नेमकं कसं बनतं? त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.

Matchstick Making Process Factory Video Viral
Viral Video: नवरा-बायकोचं भांडण मिटवायला आले अन् २ कुटुंब तक्रार निवारण केद्रांतच भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओमध्ये संपूर्ण माचीसचा कारखाणा आणि मेकींग प्रोसेस दाखवली आहे. सुरुवातील लाकडाचे ओंडके तोडून घेण्यात आले आहेत. मशीनच्या सहाय्याने हे ओंडके बारीक कापलेत. त्यानंतर लाकडाला असलेली साल एका व्यक्तीने सोलून घेतली आहे. पुढची प्रोसेस खरंच भन्नाट आहे. एका मशीनमध्ये लाकडाचा ओंडका टाकल्यानंतर तो एका बाजूने कापला जात आहे.

लाकूड कापत असताना अगदी पातळ कागदाप्रमाणे त्याचे पिस होत आहेत. सरळ लांबलचक कागदाच्या आकाराचे लाकूड काही महिलांनी एका बाजूला जुळवून ठेवले आहे. त्यानंतर त्यानंतर माचीसची काडी असते त्या समान आकारात याचे बारीक तुकडे करण्यात आलेत. पुढे एका बाजूला माचीसवर लावला जाणारा ज्वलनशील पदार्थ बनवला जात आहे.

मशीनच्याच सहाय्याने माचीसच्या काड्या एकत्र करून त्या एकाचवेळी ज्वलनशील पदार्थाच्या मिश्रणात मिक्स करत आहेत. पुढे माचीसच्या बॉक्समध्ये सर्व काड्या समान प्रमाणात भरण्यात आल्यात आणि तयार झालं तुमचं चुटकीत पेटणारं माचीस. अभिशेक नावाच्या एका तरुणाने कारखान्यातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्याच्या @thefoodiehat या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्यात. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, तंत्रज्ञान ही वस्तू स्वस्त बनवते प्रत्यक्षात ती सोन्यापेक्षा महाग आहे. माचीसचं ज्वलनशील लिक्वीड चॉकलेट सारखं वाटत आहे. खुप छान काम करत आहात, अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर आल्या आहेत. सदर व्हिडिओ तामिळनाडूमधील असल्याचं कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे.

Matchstick Making Process Factory Video Viral
Video: मतदानाआधीच बोटाला शाई? उद्धव ठाकरे यांचा भाजपवर सनसनाटी आरोप, नेमकी भानगड काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com