
भारतीय रेल्वेशी संबंधित व्हिडिओ नेहमीच चर्चेत असतात. काहींमध्ये प्रवाशांची मज्जा दिसते, तर काहींमध्ये त्यांना येणाऱ्या समस्याही झळकतात. सध्या एका व्हिडिओने लक्ष वेधले आहे, ज्यात एका अपंग व्यक्तीचा संताप दिसून येतो. ट्रेनचा दरवाजा न उघडल्याने नाराज झालेला हा व्यक्ती आपल्या कुबड्याने काच फोडण्याचा प्रयत्न करताना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतो. ही घटना पाहून प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले असून रेल्वे व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. व्हिडिओने सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया मिळवल्या आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दरवाजा न उघडल्याने संतप्त अपंग व्यक्तीने कुबड्याने काच फोडण्याचा प्रयत्न केला, पण ट्रेनमधील प्रवासी तरीही दरवाजा उघडत नाहीत. व्हिडिओ व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाने या घटनेची दखल घेतली आहे. त्यांनी क्लिप पोस्ट करणाऱ्या व्यक्तीकडून स्टेशन आणि ट्रेनची माहिती मागवत पुढील कारवाईसाठी पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
४७ सेकंदांचा हा व्हिडिओ रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभ्या ट्रेनचा आहे, जी प्रवाशांनी खचाखच भरलेली दिसते. प्रवाशांची गर्दी इतकी असते की दरवाजे बंद करून इतरांना चढण्यापासून रोखले जाते. याच परिस्थितीत एका अपंग प्रवाशाने दरवाजा उघडण्यचा प्रयत्न केले असता, मात्र तो उघडला जात नाही. या घटनेने प्रवासातील अडचणी आणि असंवेदनशीलतेचा मुद्दा उघड करत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू केली आहे. अपंग प्रवासी दरवाजा उघडण्यासाठी खुणा करतो, पण कोणीही ऐकत नाही. संतापून तो कुबडीने काच फोडण्याचा प्रयत्न करतो. यावेळी पोलीस येतो, त्याला शांत करतो आणि बाजूला बसण्याचा सल्ला देतो.
या पोस्टला आतापर्यंत १.१ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि १६ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. शेकडो लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, "मी काहीही बोललो, तर वाद होईल." दुसऱ्याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. काहींनी असे लोक तुरुंगात टाकण्याचे सुचवले, तर इतरांनी अपंग प्रवाशाला मदत न केल्याबद्दल दरवाजा बंद करणाऱ्या प्रवाशांना दोष दिला. एका कमेंटमध्ये विचारले गेले, "अपंग व्यक्ती ट्रेनमध्ये कसा चढणार?"
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.