Guyana school fire: बापरे! शिक्षकांनी मोबाईल जप्त केल्याचा राग; मुलीने अख्ख्या शाळेलाच लावली आग, २० जणांचा होरपळून मृत्यू

Girl Set Fire To School: मोबाईल जप्त केल्याने रागावलेल्या विद्यार्थिनीने शाळेला आग लावण्याची धमकीही दिली होती.
Viral FIre News
Viral FIre NewsSaamtv

Viral News: सध्याच्या तरुणाईला मोबाईलचे लागलेले वेड दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. मोबाईलसाठी तरुण तरुणी कोणत्याही ठराला जावू शकतात. ज्याची अनेक उदाहरणे ऐकायला मिळत असतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून विद्यार्थीनीने शाळेलाच आग लावल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे.

Viral FIre News
Kerala Bus Viral Video: शेजारच्या सीटवर बसून तरुणाचे अश्लील चाळे; तरुणीने थेट व्हिडिओ काढत केली पोलखोल

याबाबत अधिक माहिती अशी की, हे प्रकरण साऊथ अमेरिकेच्या गुयाना देशातील आहे. एका १४ वर्षाच्या मुलीवर तिच्याच शाळेत आग लावल्याचा आरोप आहे. या भयंकर कृत्याने २० लोकांचा जीव गेला आहे. शिक्षकांनी मुलीकडील मोबाईल जप्त केल्याने आरोपी मुलीचा संताप अनावर झाला. मोबाईल जप्त केल्याने रागावलेल्या विद्यार्थिनीने शाळेला आग लावण्याची धमकीही दिली होती.

या धमकीनंतर सोमवारी रात्री महदिया सेकेंडरी स्कूलच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररुप धारण करत शाळेचा मोठा भाग चपाट्यात घेतला. ज्यामध्ये अनेक विद्यार्थी आणि शिक्षक फसले. दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. परंतु आग आटोक्यात येईपर्यंत अडकलेल्या २० जणांचा मृत्यू झाला. राजधानी जॉर्ज टाऊनहून जवळपास २०० मील अंतरावर सेंट्रल गुयाना येथे ही घटना घडली. (Latest Marathi News)

Viral FIre News
Gautami Patil Rapchik Dance : पाटलांचा बैलगाडा...सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम..., गाैतमीच्या रापचीक डान्सनं तरुणाई घायाळ

दरम्यान, आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यात आग लावणारी अन्य कुणी नसून याच शाळेची मुलगी आहे. या मुलीचा मोबाईल टीचरने जप्त केला होता. त्यामुळे ती नाराज होती. याच गोष्टीच्या रागाच्या भरात या मुलीने अख्ख्या शाळेला आग लावली. आरोपी मुलगीही या आगीपासून वाचू शकली नाही. तिलाही आगीची झळ बसली आहे. या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. (Viral News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com