भरत नागरे
राज्यात सध्या सर्वत्र शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं नियोजन केलं जातंय. आज हिंगोलीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी शासकीय कर्मचारी गावागावात नागरिकांना कार्यक्रमाबद्दल माहिती सांगत आहेत. येथे येण्यासाठी सांगत असताना एक आजीबाई सरकारी महिला कर्मचाऱ्यावर चांगल्याच भडक्यात.
आज हिंगोलीमध्ये महाराष्ट्र शासनाचा शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडतोय. या कार्यक्रमासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केलीये. दुपारी तीन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात गावागावातून अनेक नागरिकांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी प्रशासनाने नियोजन केलं आहे.
मात्र हिंगोलीच्या आमला गावात प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना एका आजीच्या रोशाला सामोरे जावं लागलं आहे. शेती पिकत नाही मालाला भाव नाही आणि आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही अशा प्रश्नांचा शासकीय कर्मचाऱ्यांवर भडीमार करत आजीबाई चांगल्याच संतापल्यात.
या आजीबाईंनी व्यक्त केलेला राग गावातीलच एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आता शेतकरी सुद्धा हुशार झाले आहेत. पहिल्यासरखे शेतकरी राहिलेले नाहीत. इथल्या सरपंचांना इडीची भीती वाटत नाही. तुम्हाला फक्त आमच्या मागे किती माणसं आहेत हे दाखवायचंय. तुम्ही लोकांनी आतापर्यंत शेतकऱ्यांचं रक्त प्यायलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला आमच्या गावातून एकही महिला येणार नाही, असं या आजीबाईंनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.