Google Office Viral Video: गूगलची अनोखी दुनिया, जेवणानंतर झोपण्याची सोय, फाईव्ह स्टारसारखी सुविधा, पाहा व्हिडीओ

Google Office: गुगलच्या गुरुग्राम कार्यालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात लक्झरी वातावरण, आरामदायक सुविधां आणि कामाच्या ठिकाणी कर्मचार्‍यांसाठी असलेल्या विशेष व्यवस्थांची झलक दिसते.
गूगलची अनोखी दुनिया, जेवणानंतर झोपण्याची सोय, फाईव्ह स्टारसारखी सुविधा, पाहा व्हिडीओ
गूगलची अनोखी दुनिया, जेवणानंतर झोपण्याची सोय, फाईव्ह स्टारसारखी सुविधा, पाहा व्हिडीओGoogle
Published On

गुगलच्या गुरुग्राम कार्यालयाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. शिवांगी गुप्ताने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये गुगलच्या कार्यालयातील लक्झुरियस आणि अपारंपरिक वातावरणाची झलक दिसते.

गुगलच्या ऑफिसेसना जगभरात त्यांच्या आधुनिक सुविधा आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विशेष व्यवस्थांमुळे ओळखले जाते. या व्हिडिओत तिने दिवसाची सुरुवात कशी होते, कँटीनमधील विविध प्रकारचे जेवण, आरामदायी कामाचे ठिकाण, फिटनेस सुविधा आणि इतर सुविधा दाखवल्या आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून अनेक लोकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हे वातावरण पाहून आश्चर्य व्यक्त केले, तर काहींना हे पाहून थोडा हेवाही वाटला.

गूगलची अनोखी दुनिया, जेवणानंतर झोपण्याची सोय, फाईव्ह स्टारसारखी सुविधा, पाहा व्हिडीओ
Viral Video: पोलिसाचा निर्दयीपणा! सायकलवर जाणाऱ्या मुलाला बेदम मारले,VIDEO पाहून लोक संतापले

व्हिडिओमध्ये ती ऑफिसमध्ये पोहोचल्यावर मायक्रो किचनमध्ये जाऊन दिवसाची सुरुवात करताना दिसते. तिने टेक व्हेंडिंग मशीनमधून आवश्यक वस्तू घेतल्या, गेम्स रूममध्ये जाऊन विचारमंथन केले, आणि मग ईमेल्स तपासण्यासाठी एक शांत जागा शोधली. तिच्या दैनंदिन रुटीनमध्ये स्वादिष्ट कॉन्टिनेंटल जेवण, ऑफिसमधील आरामदायी झोप, आणि मसाज खुर्चीवर आराम करण्यासारख्या गोष्टी होत्या.

हा व्हिडिओ पाहून अनेकांना गुगलसारख्या कंपनीत काम करण्याची इच्छा वाटली असेल. गुगलचे ऑफिस केवळ कामासाठीच नव्हे, तर कर्मचार्‍यांना आराम आणि चांगले वातावरण देण्यासाठीही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ इतका चर्चेत आला आहे.

सुसज्ज असलेल्या मायक्रो-किचनपासून ते पूल टेबल असलेल्या गेम रूमपर्यंत, ही जागा खऱ्या अर्थाने लक्झरी रिट्रीटसारखी वाटत होती, जणू काही ती कामाच्या ठिकाणापेक्षा आरामदायी विश्रांतीस्थळच होती.

सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून, या व्हिडिओला १.३ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि अर्थातच, सोशल मीडिया यूजर्समध्ये याबद्दल चर्चा रंगली आहे.

एका यूजरने कमेंट केली, "इतका आनंद तर मला प्रवासातही मिळत नाही!"

दुसऱ्याने लिहिले, "हे तर एखाद्या स्वप्नातील ठिकाणासारखे वाटते."

एका यूजरने अगदी अचूकपणे प्रतिक्रिया देत म्हटले, "मला गुगलमध्ये काम हवे!"

गूगलची अनोखी दुनिया, जेवणानंतर झोपण्याची सोय, फाईव्ह स्टारसारखी सुविधा, पाहा व्हिडीओ
Viral News: धक्कादायक! आईस्क्रीममध्ये आढळला चक्क साप,ग्राहकाचा संताप; पाहा PHOTO

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अशा प्रकारच्या ऑफिस कल्चरचे कौतुक केले असून, भविष्यातील कार्यालये कशी असावीत याचा एक नवा आदर्श या कार्यालयाने स्थापित केला आहे, असे मत सोशल मिडीयीवर व्यक्त केले जात आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com