Snake Viral Video: मस्ती केली, फजिती झाली! तरुणी सापाला किस करायला गेली अन् घडलं भयंकर; थेट ओठ... पाहा VIDEO

Snake Grabbed Womens Mouth Viral Video: भल्यामोठ्या अजगराशी मस्ती करण्याचा कारनामा तिच्या चांगलाच अंगलट आहे.
Girl Kissing Snake Viral Video
Girl Kissing Snake Viral VideoSaamtv

Girl Kissing A Snake Viral Video: सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. सोशल मीडिया हा सध्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. याच सोशल मीडियामुळे अनेकजण अगदी रातोरात स्टार झाल्याचेही असंख्य उदाहरणे आपल्याला ऐकायला मिळतात.

त्यामुळेच सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी तरुणाई अनेकदा जीवघेणे स्टंटही करताना दिसते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामधील तरुणीला सापासोबत स्टंट करणे चांगलेच महागात पडले आहे. (Girl kisses massive python Viral Video)

Girl Kissing Snake Viral Video
Ruturaj Gaikwad Wife: ऋतुराज- उत्कर्षाची प्यारवाली लव्हस्टोरी! CSK चा विजय अन् भरमैदानात मारली मिठी - VIDEO

काय आहे व्हिडिओ...

सध्याच्या तरुणाईला सोशल (Social Media) मीडियाचे चांगलेच व्यसन लागले आहे. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी किंवा लाईक्स मिळवण्यासाठी तरुण- तरुणी कोणतेही स्टंट करायला तयार असतात. मात्र असे स्टंट अनेकदा जीवावरही बेतू शकतात. (Girl& Snake Viral Video)

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुणी भल्यामोठ्या अजगराशी मस्ती करताना दिसत आहे. ही तरुणी सापाला हातात घेवून त्याला किस करण्याच धाडस करत आहे. मात्र तिचा हाच कारनामा तिच्या चांगलाच अंगलट आहे. (Latest Marathi News)

Girl Kissing Snake Viral Video
Push-ups on Car Viral Video: धावत्या कारच्या टपावर मारले पुशअप्स; Video Viral होताच उतरली मस्ती

स्टंट पडला महागात..

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण महाकाय अजगर हातात घेवून उभा असल्याचे दिसत आहे. तर त्याच्या शेजारीच दोन तरुणी या सापाला पाहत आहेत. अचानक एक तरुणी त्या अजगराला किस करायला ओठ पुढे करते. त्याचवेळी तो मोठा अजगर तरुणीचे थेट ओठ पकडतो. अचानक अजगराने केलेल्या या हल्ल्याने तरुणी चांगलीच घाबरुन गेल्याचे पाहायला मिळत आहे.

अजगर मुलीचा ओठ इतका जोरात पकडते की सर्वच जण घाबरुन गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. सापाला पकडलेला तरुणही मुलीला सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. हा संपूर्ण प्रकार पाहून आपल्याही अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही...

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया....

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी व्हिडिओमधील तरुणीला स्टंट कशाला करायचा असे म्हणत खडेबोल सुणावले आहेत, तर काही जणांनी प्रसिद्धीसाठी असे जीवघेणे प्रकार करु नका असे आवाहनही केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com