Ghaziabad News: बदला घेण्यासाठी जेवणात लघवी मिसळायची, मोलकरणीने सांगितले किळसवाण्या कृत्याचे कारण; पोलिसही हादरले

Ghaziabad Maid Latest News: रोज पुन्हा पुन्हा असा अपमान सहन करून ती कंटाळली होती. सुरुवातीला तिने हा त्रास सहन केला. मात्र नंतर तिने रोजच्या अपमानाचा बदला घेण्याचे ठरवले.
Ghaziabad Maid News: किळसवाण्या कृत्याची हद्द! मोलकरीण लघवी मिसळायची अन् जेवण बनवायची; अख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल
Maid Cooking With Urine: Saamtv
Published On

Ghaziabad Maid News: घरात काम करणारी मोलकरीण स्वयपाकाच्या भांड्यांमध्ये लघवी करुन जेवण बनवत असल्याचा किळसवाणा प्रकार गाझियाबादमधून समोर आला होता. अन्नामध्ये लघवी मिसळून जेवन देण्याचा हा संतापजनक प्रकार तब्बल आठ वर्षांपासून सुरु होता. अखेर याबाबत पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित मोलकरणीला अटक करण्यात आली आहे. आता पोलिसांच्या तपासात या मोलकरणीने विकृत कृत्यामागचे कारण सांगितले आहे, जे ऐकून पोलिसही हादरुन केले.

Ghaziabad Maid News: किळसवाण्या कृत्याची हद्द! मोलकरीण लघवी मिसळायची अन् जेवण बनवायची; अख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल
Maharashtra Politics: काँग्रेसचं ठरलं! उमेदवारांची पहिली यादी 'या' तारखेला येणार; कोणाची लॉटरी लागणार?

आरोपी मोलकरणीचे नाव रीना असून ती शांतीनगर येथील रहिवासी आहे. ती मूळची खुर्जा बुलंदशहर येथील रहिवासी आहे. 8 वर्षांपूर्वी ती आपला उदरनिर्वाह करण्यासाठी गाझियाबादला आली होती. येथे तिने शांतीनगर येथील क्रॉसिंग रिपब्लिक या सोसायटीत राहणाऱ्या रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या घरात स्वयंपाक करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला सर्वांना तिचा स्वयंपाक आवडायचा मात्र नंतर तिला सर्वजण छोटय़ा छोटय़ा गोष्टीवरून शिवीगाळ व अपमानित करायचे.

दोन-तीन वर्षांपासून व्यावसायिकाचे कुटुंब तिने तयार केलेले जेवण खाऊन खूप आनंदी होते, पण नंतर कुटुंबातील सर्वजण तिला शिव्या देऊ लागले. अनेकवेळा त्यांच्या कुटुंबातील कोणाची तरी चूक झाली तरी दिला दोषी ठरवले जायचे. रोज पुन्हा पुन्हा असा अपमान सहन करून ती कंटाळली होती. सुरुवातीला तिने हा त्रास सहन केला. मात्र नंतर तिने रोजच्या अपमानाचा बदला घेण्याचे ठरवले.

Ghaziabad Maid News: किळसवाण्या कृत्याची हद्द! मोलकरीण लघवी मिसळायची अन् जेवण बनवायची; अख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल
Sanjay Raut: 'भाजप, आरएसएसचा अजेंडा, म्हणून न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काळी पट्टी हटवली..', संजय राऊत कडाडले

दरम्यान, तिने पोलिस चौकशीत सांगितले की, ती 4 महिन्यांपासून पीठ मळण्यासाठी लघवीचा वापर करत होती. इतकंच नाही तर ती रोटय़ा बनवल्यानंतर आणि त्यांना जेवण दिल्यावर कुटुंब पाहत असे. हे करताना त्याला खूप आनंद वाटला. इतकेच नव्हेतर ती घरातील वस्तू, भाज्याही घरी चोरून न्यायची. ज्यामुळे घरमालकांचा तिच्यावर संशय बळावला. धक्कादायक म्हणजे घरातील सदस्यांनाही यकृताचा त्रास जाणवू लागला, ज्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

Ghaziabad Maid News: किळसवाण्या कृत्याची हद्द! मोलकरीण लघवी मिसळायची अन् जेवण बनवायची; अख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल
Accident: नांदेडमध्ये हिट अँड रन; टेम्पोच्या धडकेत वयोवृद्ध पती-पत्नी जागीच ठार, नागरिकांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com