नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय, आणि नवरात्री म्हटलं की गरबा आलाच. आता गरबा खेळण्यासाठी तुमच्यासोबत पार्टनर नसला तरी टेन्शन घेण्याचं कारण नाही. कारण तुम्हाला भाड्याने पार्टनर मिळू शकतो असा दावा करण्यात आलाय. खिशाला परवडेल अशा दरात भाड्याने गरबा पार्टनर मिळेल अशी पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतीय. त्यासाठी पॅकेजही जाहीर करण्यात आलंय. व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय. पाहूयात
गरबा खेळण्यासाठी पार्टनर भाड्याने मिळेल. एकट्याने गरबा खेळायला जाऊ नका. अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियात तुफान व्हायरल होतोय. महत्वाचं म्हणजे या मेसेजसोबत काही पॅकेजेसही देण्यात आलेत. त्यात तुम्हाला गरबा खेळण्यासाठी पार्टनर हवा असल्यास किती रूपये मोजावे लागतील हे देखील सांगण्यात आलंय.
गरबा पार्टरनरसाठी किती पैसे मोजावे लागतील?
सिल्व्हर पॅकेज (1000 रूपये)
2 तासांसाठी गरबा पार्टनर मिळेल
मॅचिंग आऊटफिट
बेसिक स्टेप्स
क्युट सेल्फी घेतला जाईल
गोल्ड पॅकेज (1500 रूपये)
4 तासांसाठी गरबा पार्टनर मिळेल
मॅचिंग आऊटफिट
रील्स आणि इन्स्टाग्रामसाठी फोटो
इतर लोक पार्टनरला भाऊ किंवा वहिनी हाक मारू शकतात
प्लॅटिनियम पॅकेज (200 रूपये)
संपूर्ण दिवस गरबा
बेस्ट डान्स मुव्हज
दुप्पट्टा, झुमके सांभाळले जातील
घरापर्यंत सुरक्षित सोडण्यात येईल
सोशल मीडियातल्या या पोस्टमुळे सारेच जण आश्चर्यचकित झाले आहेत. खरंच गरबा खेळण्यासाठी भाड्याने पार्टनर मिळू शकतो का? त्यासाठी कुणाशी संपर्क साधावा लागेल? असे प्रश्न उपस्थित झाल्यानं आम्ही या मेसेजची सत्यता पडताळून पाहिली. इंटरनेटवर याविषयी अधिक माहिती मिळवली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात..
सोशल मीडियात व्हायरल झालेली पोस्ट खरी आहे
कृष्णा मिस्त्री नावाने ही पोस्ट व्हायरल करण्यात आलीय
पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्याबाबत पुष्टी होऊ शकलेली नाही
नवरात्रौत्सव जवळ आल्यानं अनेकजण गरबा खेळण्याची तयारी करतायेत. ज्यांच्याजवळ पार्टनर नाही अशा लोकांमध्ये या पोस्टवरून उत्सुकता निर्माण झालीय. सोशल मीडियात ही पोस्ट व्हायरल करून पार्टरनर बाबत पॅकेजेस जाहीर करण्यात आले असले तरी संबंधित व्यक्तीनं ही पोस्ट व्यावसायिक हेतूनं टाकलीय की केवळ गंमत म्हणून हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे सोशल मीडियातल्या जाहिरातीवरून असा कोणताही पार्टनर भाड्याने घेण्यापूर्वी काळजी घ्या. यात तुमची फसवणूकही होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.