Fact Check: बिबट्यांच्या जुन्नरमध्ये वाघाचा धुमाकूळ? वस्त्यांमध्ये फिरतोय आता पट्टेरी वाघ?

Forest Department Confirms No Tiger: जुन्नरमध्ये वाघ फिरतोय असा दावा करण्यात आलाय...वाघाचे फोटोही व्हायरल करण्यात आलेयत...पण, खरंच आता बिबट्यानंतर वाघाने दहशत माजवलीय का...?
AI-generated tiger photo goes viral from Junnar; Forest Department confirms no real tiger sighting.
AI-generated tiger photo goes viral from Junnar; Forest Department confirms no real tiger sighting.Saam Tv
Published On

पुण्यातील जुन्नरमध्ये बिबट्याने दहशत माजवलीये...त्यातच आता पट्टेरी वाघही फिरत असल्याचा दावा करण्यात आलाय...पट्टेरी वाघाचे फोटोही व्हायरल होतायत...एका शेतात हा वाघ उभा असतानाचा फोटो काढण्यात आलाय...यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय...पण, खरंच जुन्नरमध्ये वाघ फिरतोय का...? हा फोटो नक्की कुणी काढलाय...? असे प्रश्न उपस्थित होत असून, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, सध्या बिबट्या वस्तीत शिरून हल्ले करतायत...त्यातच आता वाघ दिसल्याने हा फोटो कुठला आहे...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली..

जुन्नरमध्ये पट्टेरी वाघ दिसला.शेतात फिरत असताना वाघाचा फोटो काढण्यात आलाय. हा फोटो आणि मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी केली...हा फोटो खरा आहे का...? हे आम्ही AIच्या माध्यमातून शोधलं...

व्हायरल होत असलेला वाघाचा फोटो AI निर्मित

जुन्नरमध्ये पट्टेरी वाघ आढळलेला नाही

वाघाचा फोटो बनवणाऱ्याला वनविभागाची नोटीस

नोटीस पाठवल्यानंतर फोटो बनवणाऱ्याची माफी

अफवा पसरवणे, भीती निर्माण करणे यामुळे कडक कारवाई होऊ शकते...तीन वर्षापर्यंतच्या कारावासाची तसेच 1 लाख रुपयापर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद असल्याचं वनविभागानं म्हटलंय...

सध्या जुन्नरमध्ये बिबट्याची दहशत आहे...अनेक ठिकाणी बिबट्याने हल्लाही केलाय...त्यामुळे आता वाघाचा फोटो व्हायरल करण्यात आलाय...मात्र, हा फोटो एआय निर्मित असून घाबरून जाऊ नका असं आवाहन करण्यात आलंय...त्यामुळे आमच्या पडताळणीत जुन्नरमध्ये पट्टेरी वाघ आढळल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com