Fact Check : कोकणात उतरलंय 'एलियन शिप', काय आहे नेमका प्रकार? जाणून घ्या

Kokan Alien Viral News : कोकणात आकाशात दिसलेल्या प्रकाशमान वस्तूंमुळे एलियन शिपची चर्चा रंगली होती. मात्र तथ्य पडताळणीत या वस्तू स्टारलिंकचे उपग्रह असल्याचं स्पष्ट झालं असून नागरिकांनी घाबरू नये असा सल्ला देण्यात आला आहे.
Fact Check : कोकणात उतरलंय  'एलियन शिप', काय आहे नेमका प्रकार? जाणून घ्या
Kokan Alien Viral NewsSaam Tv
Published On
Summary
  • रत्नागिरीसह कोकणात आकाशात प्रकाशमान वस्तू दिसल्याने भीती पसरली

  • व्हायरल व्हिडिओमुळे एलियन शिप असल्याच्या चर्चा रंगल्या

  • तथ्य पडताळणीत त्या स्टारलिंक उपग्रहांची रांग असल्याचं स्पष्ट झालं

  • तज्ज्ञांनी नागरिकांना घाबरू नये आणि ही सामान्य अवकाशीय घटना असल्याचं सांगितलं

कोकणच्या आकाशात 'एलियन शिप' दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. पण व्हायरल व्हिडिओत दिसत असलेले खरंच एलियन आहेत का? आम्ही व्हायरल व्हिडिओची पडताळणी केली आहे. त्यावेळी काय सत्य समोर आलं वाचा.

रत्नागिरीतील अनेक भागांत आकाशात एकामागोमाग एक २० ते २५ प्रकाशमान वस्तू पुढे सरकताना दिसल्या.नारायण मळी परिसरासह सावर्डे, संगमेश्वर आणि लांजा भागातील लोकांनी ही प्रकाशमान वस्तू पाहिली. अचानक आकाशातून खाली काय आलं? एलियन पृथ्वीवर उतरले का? अशी चर्चा सुरू झाली आणि भीतीचं वातावरण पसरलं. नक्की हे काय होतं? जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने ज्यांनी व्हिडिओ बनवला त्यांचीच भेट घेतली.

Fact Check : कोकणात उतरलंय  'एलियन शिप', काय आहे नेमका प्रकार? जाणून घ्या
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, ५ ते ६ जण गंभीर जखमी; नेमकं कारण काय?

आकाशात चमकणाऱ्या वस्तू दिसल्या हे खरं असल्याचं स्पष्ट झालं...पण, नक्की दिसतंय ते काय आहे...? एलियन शिप आहे का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी खगोल अभ्यासकांकडून अधिक माहिती जाणून घेतली. आकाशात दिसणारं एलियन शिप नसून, ते स्टार लिंक कंपनीने कृत्रिम उपग्रह आकाशात सोडल्याचं स्पष्ट झालं.

हे उपग्रह दिसण्याचं वेळापत्रकही उपलब्ध असतं. त्यानुसार आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासारख्या अवकाशातील वस्तू पाहता येतात. त्यामुळे आमच्या पडताळणीत हे एलियन शिप असल्याचा दावा असत्य ठरला आहे. याचा माणसांना कोणताही धोका नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com