बंगरूळू : (Engineer beggar viral video) अनेक वेळा लोक गजबजलेल्या रस्त्यावर किंवा ट्रॅफिक सिग्नलवर पैसे मागायला येतात. पण एक भिकारी लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपले ज्ञान दाखवत असल्याचे पाहून बेंगळुरूमधील एका व्यक्तीला धक्काच बसला. खरं तर तो जन्मतः भिकारी नाही हे त्याला पाहिल्यावर सहज लक्षात येतं.
जेव्हा एका इंस्टाग्रामरने त्या माणसाला पाहिले तेव्हा त्याने त्याच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती भौतिकशास्त्राचा सिद्धांत आणि त्याच्या संकल्पनांवर बोलताना दिसत आहे. त्या माणसाची इंग्रजी बोलण्याची पद्धतही परदेशी असल्याचे जाणवते. तो अख्खलिखीत इंग्रजी बोलत असल्याचे दिसून येत आहे.
भिकारी सांगू लागला आईनस्टाईनचा सिद्धांत
इंस्टाग्राम वापरकर्ता शरथ युवराजने दावा केला आहे की त्याने एका व्यक्तीला बेंगळुरूच्या रस्त्यावर भीक मागताना पाहिले आणि अचानक तो आइनस्टाइनच्या भौतिकशास्त्राच्या सिद्धांताबद्दल बोलू लागला. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती म्हणते- 1904 मध्ये आईन्स्टाईने 'थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी' हे पुस्तक लिहिले. प्रथम त्यांनी विशेष सापेक्षता सिद्धांत लिहिला, त्यानंतर त्यांनी आणखी एक सिद्धांत लिहिला जो 10 वर्षांनी आला. काहीही काम केले नाही, काहीही कार्य केले नाही, परंतु त्याला भौतिकशास्त्रज्ञ मानले जाते. असा तो म्हणाला.
त्या व्यक्तीची अशी अवस्था कशी झाली व्हिडीओत दिसणाऱअया त्या व्यक्तीची इंग्रजीवर चांगली पकड आहे. आता तुम्हीही विचार करत असाल की भिकारी एवढं चांगलं इंग्रजी कसं बोलू शकतो आणि भौतिकशास्त्राबद्दल एवढं बोलू शकतो. पण या व्यक्तीची खरी कहाणी हृदय पिळवटून टाकणारी आहे. इंस्टाग्राम वापरकर्ता शरथचा दावा आहे की, भिकारी 'माइंड ट्री ग्लोबल व्हिलेज'मध्ये प्रोडक्ट इंजिनिअर होता. त्यांनी फ्रँकफर्ट जर्मनी येथून एमएसचे शिक्षण घेतले. पण, प्रेयसी आणि आई-वडील गमावल्यानंतर त्याचे दु:ख कमी करण्यासाठी त्याने दारू पिण्यास सुरुवात केली आणि आता त्याची अवस्था अशी झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यूजर्स या व्हिडिओवर भरभरून कमेंट करत आहेत. अनेक वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की त्याला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले पाहिजे जेणेकरुन तो सामान्य आयुष्य जगू शकेल.
Edited By- नितीश गाडगे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.