
यंदा २७ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वत्र लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पाच्या स्वागताची तयारीला सुरूवात झाली आहे. गणपती बाप्पाच्या फराळापासून ते गणपती मखर सजावटीसाठी योजना आखणी सुरू आहे. मात्र अनेकांना दैनदिन कामातून सजावटीसाठी वेळ मिळत नाही. तुमचीही अशीच अडचण असेल आणि आता ऐनवेळी कसं काय करावं याचं टेन्शन दूर होणार आहे. अगदी कमी वेळात गणपतीसाठी छान आरास करता येणार आहे.
तुम्ही अगदी घरच्या घरी गणपतीसाठी आकर्षक सजावट करू शकता. खिडकीच्या शेजारी तुम्ही बँकड्रॉप म्हणून तुम्ही रंगीबेरंगी पडदे लावू शकता. यावर तुम्ही फुलांच्या रंगीबेरंगी माळा लावा. त्यासमोर एक टेबल ठेवून त्यावर लोखंडी स्टॅड बनवून घ्या जो तुम्ही दरवर्षी उपयोगी पडणार आहे. त्यावर देखील तुम्ही पडदे लावून डिझाईन करू शकता.यावर देखील तुम्ही फुलांच्या माळा लावा ज्यामुळे सजावट आकर्षक दिसेल.
महिलांकडे रंगीबेरंगी ओढण्या असतात या एकमेकींशी रंगसंगती जुळणाऱ्या ओढण्या घेऊन त्यांना सेलोटेप लावून त्याची कमान केली तरीदेखील आकर्षक डिझाईन होईल यावर तुम्ही लाईटिंग देखील लावू शकता. तसेच यावर तुम्ही फुलांच्या माळा सोडून देऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.