Viral Video: निर्दयीपणाचा कळस! चोरीच्या आरोपावरुन वाद; तरुणाला रिक्षाला बांधून फरफटत नेले... संतापजनक VIDEO

Viral Video: ई- रिक्षा चालकावर चोरीचा आळ घेतल्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. रस्त्यावरुन येणारे जाणारे लोक या रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न करतात.
Viral Video:
Viral Video: Saamtv

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी भन्नाट डान्स, तर कधी भयंकर अपघातांची दृश्ये या व्हिडिओंमधून पाहायला मिळतात. यामधील काही घटना इतक्या भयंकर असतात की पाहणाऱ्याही थरकाप उडतो. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यामागची स्टोरी वाचून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर अनेक भीषण अपघाताचे व्हिडिओ पाहायला मिळतात. यामधील काही व्हिडिओ इतके भयानक असतात की पाहणाऱ्याच्या काळजाचा थरकाप उडतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक ई- रिक्षाचालक एका व्यक्तीला भररस्त्यात फरफटत नेत असल्याचे दिसत आहे.

त्या व्यक्तीने ई- रिक्षा चालकावर चोरीचा आळ घेतल्याने हे धक्कादायक कृत्य केल्याचे समोर आले आहे. रस्त्यावरुन येणारे जाणारे लोक या रिक्षाचालकाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र तो कोणाचेही न ऐकता रिक्षा पळवतो. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Viral Video:
Stunt Video: स्टंट की मृत्यूला निमंत्रण? रील बनविण्यासाठी तरूण भररधाव कारला लटकला; थरारक VIDEO व्हायरल

या धक्कादायक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रिक्षाला लटकत आहे. तशाच परिस्थितीत रिक्षाचालक त्याला फरफटत नेत आहे. रिक्षाला लटकणारा व्यक्ती येणा- जाणाऱ्यांना थांबवण्याची विनंती करत आहे. मात्र लोकांच्या विरोधाला न जुमानता तो रिक्षाचालक सुसाट वेगाने जात असल्याचे दिसत आहे. ही संतापजनक घटना कोणत्या भागातील आहे, याबाबत माहिती समोर आली नाही. मात्र नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त करत रिक्षाचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Viral Video:
Sujat Ambedkar: काँग्रेस हीच भाजपची बी टीम : सुजात आंबेडकर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com