Viral Video: आईला मी आवडत नाही, बाबांनी मला प्रमाने हाक मारावी; चिमुरड्याचा हा VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Little Boy Viral Video: सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात लहान मुलं मस्ती करतानाचे किंवा खेळतानाचे असतात. तर काही व्हिडीओमध्ये लहान मुलं ना ना प्रश्न विचारून भंडावून सोडतात.
Little Boy Viral Video
Little Boy Viral VideoSaam Digital

Little Boy Crying Viral Video

सोशल मीडियावर लहान मुलांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात लहान मुलं मस्ती करतानाचे किंवा खेळतानाचे असतात. तर काही व्हिडीओमध्ये लहान मुलं ना ना प्रश्न विचारून भंडावून सोडतात. हे व्हिडीओ पाहून युजर पोट धरुन हसताता. तर या लहान मुलाच्या क्युटनेसच्या प्रेमात पडतात. आता आणखीन एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पण या लहान मुलाचा व्हिडीओ पाहून ना कोणी हसतंय, तर ना कोणी त्याच्या क्युटनेसच्या प्रेमात पडतंय. या व्हिडीओतील मुलाचं दुःख पाहून अनेकजण गहिवरलेत. .('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Little Boy Viral Video
Marathi Pori Viral Video: कॅनडातही मराठी गाण्यांची क्रेझ; हिरव्या साडीत 'मराठी पोरी' गाण्यावर तरुणीचा कडक डान्स, VIDEO व्हायरल

दक्षिण कोरियातील एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या मुलाचं नाव ज्यूम जी-युन आहे. या व्हिडीओमध्ये या लहान मुलाला काही प्रश्न विचारली जातात. पण त्याच्या प्रश्नाच्या उत्तरावर अनेकजणांच्या डोळ्यांत पाणी आलंय.

ज्यूमला विचारलंय की तुला सगळ्यात कोण आवडतं. तेव्हा ज्यूम म्हणतो की माहित नाही. कारण मी घरी एकटाच असतो. माझ्याबरोबर खेळायलाही कोणी नसतं.

ज्यूमला त्याच्या वडिलांबद्दल विचारलं तेव्हा त्याने धक्कादायक उत्तरं दिली. बाबा जेव्हा चिडतात तेव्हा ते खूप ओरडतात आणि वेड्यासारखे वागतात असं ज्यूमने सांगितलं. बाबांकडून काय अपेक्षा आहेत असं त्याला विचारलं तेव्हा ज्यूम म्हणाला की बाबांनी मला प्रेमाने हाक मारावी. कधी तरी बाबा मला प्रेमाने हाक मारतील अशी भाबडी आशा त्याने व्यक्त केलीये.

मुलाखातकाराने ज्यूमला आई बद्दल विचारलं. तेव्हा त्याची उत्तरं तुम्ही ऐकून आवाकच व्हाल. कदाचित माझ्या आईला मी आवडत नाही असं ज्यूम म्हणाला. आपल्या आईबद्दल बोलताना ज्यूमच्या डोळ्यांत अक्षरश: अश्रू तरळले. आपल्या आईसोबत तु याबद्दल बोललास का यावर ज्यूम म्हणाला की ती माझं कधीच ऐकत नाही. आईने माझ्यासोबत खेळावं, अशी साधी अपेक्षा ज्यूमने व्यक्त केलीये. पूर्वीचे ट्विटर आणि आताचे एक्स या सोशल मिडीयाच्या @a__vanita अकांऊटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय.

या व्हिडीओला आतापर्यंत ४८ लाख व्हूज मिळालेत. या व्हिडीओला आतापर्यंत ५१ हजार लाईक्स, १४ हजार शेअर आणि दीड हजारहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्यात.

कुठल्याही लहान मुलाच्या वाट्याला अशी दुःख येऊ नये असं एका युजरने म्हटलंय. तर जर मुलं सांभाळताच येत नसतील तर काही लोक मुलं जन्माला का घालतात असा संतप्त सवालही काही युजर्संनी विचारलाय. अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यावर आपले अश्रू रोखता आले नाही अशी कबुली दिलीये.

Little Boy Viral Video
Viral Video: एका पोरावर दोघींचा जीव जडला अन् झाला राडा ! पोरींची भररस्त्यात तुफान हाणामारी; VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com