Viral Video: कडक उन्हापासून वाचण्यासाठी रिक्षाचालकाचा हटके जुगाड; Viral Video पाहून म्हणाल...

Desi Jugad Viral Video: सध्या कडक उन्हाचा तडाखा राज्यभर जाणवू लागला आहे. गरमीपासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येकजण काहीना काही उपाय करत असतो
Viral Video
Viral Videosaam tv

सध्या कडक उन्हाचा तडाखा राज्यभर जाणवू लागला आहे. गरमीपासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येकजण काहीना काही उपाय करत असतो.मात्र अनेकदा काही कामानिमित्त घराबाहेर पडताना प्रत्येकाला कडक उन्हाचा सामना करावा लागतो.

Viral Video
Andhra Pradesh Viral Video: नवरदेवाच्या अंगावर फेकली मिर्ची पावडर...नवरीला तिच्याच घरच्यांनी केलं किडनॅप; पाहा धक्कादायक VIDEO

काहीवेळेस अनेकजण एसी वाहनांनी प्रवास करत असतो तर कधी आपल्याला अनेक ऑटो रिक्षा चालक प्रवाशांच्या काळजीसाठी त्यांच्या वाहनांमध्ये अनोखे जुगाड करत असतात. त्यातच सोशल मीडियावर एका ऑटो रिक्षा चालकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात त्याने कडक उन्हापासून वाचण्यासाठी अनोखा जुगाड केला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक पिवळ्या रंगाची एक ऑटो रिक्षा आपल्याला दिसत आहे. मात्र या ऑटो रिक्षाचे एक वेगळेपण म्हणजे या ऑटो रिक्षाच्या चालकाने त्याच्या ऑटो रिक्षामध्ये थंडावा निर्माण करण्यासाठी चक्क गवत निर्माण केले आहे. त्यासाठी त्याने काही पोत्यांचा वापर केला आहे. ती पोती ऑटो रिक्षाला व्यवस्थित बांधून त्यातून लहान लहान गवत निर्मिती केली आहे. या गमताने ऑटो रिक्षाच्या आतमध्ये बसलेल्या प्रवाशांना गरमीपासून काही प्रमाणात आराम मिळेल आणि थंडवा मिळेल.

@shetivadi या सोशल मीडिया अकाउंट इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. या आधीही मिडिया प्लॅटफॉर्मवर अनेक ऑटो रिक्षा चालकाचे व्हिडिओ व्हायरल झाले ज्यात अशाच प्रकारचे अनेक जुगाड आपल्याला पाहायला मिळालेत

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुठल्या शहरातील आहे हे नेमके समजू शकलेले नाही. मात्र व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, 'खूप छान' अशा अनेक प्रकारच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Viral Video
Viral Video: दुबईच्या पुरातून बाहेर काढण्यासाठी अप्रतिम बिझनेस आयडिया; चक्क शॉपिंग कार्टमध्ये बसवून लोकांना नेले बाहेर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com