Andhra Pradesh Viral Video: नवरदेवाच्या अंगावर फेकली मिर्ची पावडर...नवरीला तिच्याच घरच्यांनी केलं किडनॅप; पाहा धक्कादायक VIDEO

Family Trying To Kidnap Groom: नवरा आणि नवरीला किडनॅप करणारी लोकं दुसरी तिसरी कोणी नाही तर नवरीचे कुटुंबीय आहेत. त्यांनी आधी नवरदेवाच्या तोंडावर मिर्ची पावडर टाकली. त्यानंतर नवरीला हाताला धरून ते खेचत घेऊन गेले.
Andhra Pradesh News
Andhra Pradesh News Saam Tv

आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) एका लग्नसमारंभामध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नामध्ये आनंदात सर्व विधी सुरू होते. अशामध्ये काही जणांनी नवरा आणि नवरीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना नेमकी काय आहे आणि नवरीच्या नातेवाईकांनी असं का केलं हे आपण जाणून घेणार आहोत...

नवरा आणि नवरीला किडनॅप करणारी लोकं दुसरी तिसरी कोणी नाही तर नवरीचे कुटुंबीय आहेत. त्यांनी आधी नवरदेवाच्या तोंडावर मिर्ची पावडर टाकली. त्यानंतर नवरीला हाताला धरून ते खेचत घेऊन गेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो पाहून नेटिझन्सला धक्का बसला आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काही लोकं नवरीला जबरदस्तीने लग्नाच्या हॉलमधून खेचत घेऊन जात आहेत. नवरी त्यांना विरोध करत आहे. तरी देखील एक व्यक्ती नवरीला जबरदस्ती ओढून घेऊन जात आहे. हे सर्वजण नवरीचेच नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. त्यांनी नवरदेवाच्या तोंडावर मिर्ची पावडर टाकल्याचे दिसत आहे. त्यामुळे नवरदेवाला काहीच दिसत नसल्याचे तो कसा बसा बाजूला होताना दिसत आहे.

हे प्रकरण आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील आहे. लग्नानंतर रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ही घटना घडली. नवरीचे नाव गंगावरम स्नेहा आणि नवरदेवाचे नाव बत्तीना वेंकटनंदू असे आहे. या दोघांची भेट नरसरावपेट जिल्ह्यातील एका महाविद्यालयात झाली होती. इथेच दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले.

Andhra Pradesh News
Delhi Liquor Scam: अरविंद केजरीवाल आणि के. कविता यांना कोर्टाचा झटका, ७ मेपर्यंत कोठडीत वाढ

13 एप्रिल रोजी विजयवाडा येथील प्रसिद्ध दुर्गा मंदिरात दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी 21 एप्रिल रोजी रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. यामध्ये मुलीच्या कुटुंबीयांनाही बोलावण्यात आले होते. रिसेप्शनला मुलीचे कुटुंबीय पोहचले खरे पण त्यांनी राडा केला. त्यांनी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेवरून झालेल्या हाणामारीत नवरदेवाकडचे काही नातेवाईक गंभीर जखमी झाले आहेत.

Andhra Pradesh News
Arvind Kejariwal Arrest ED : मुख्यमंत्र्यांपासून राज्यसभा खासदारांपर्यंत... कोण आहेत दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक झालेले १६ जण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com