Viral Video: 'तू आधी खाली उतर,मग तुला बघतो....'; दिल्ली मेट्रोत सीटवरून दोन प्रवाशांमध्ये बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल

Delhi Metro: दिल्ली मेट्रो म्हणजे मनोरंजनाचा खजिना असे म्हणायला हरकत नाही. दिल्ली मेट्रोतील अनेकवेळा प्रेमीयुगुलांचे तसेच भांडणाचे आणि काहीतरी विचित्र घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Viral Video
Viral Videosaam digital

Delhi Metro Viral Video

दिल्ली मेट्रो म्हणजे मनोरंजनाचा खजिना असे म्हणायला हरकत नाही. दिल्ली मेट्रोतील अनेकवेळा प्रेमीयुगुलांचे तसेच भांडणाचे आणि काहीतरी विचित्र घटनांचे व्हिडिओ(Video) सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दिल्ली मेट्रोतील वादविवादाचा एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Viral Video
Delhi Viral Video: रिल्ससाठी स्टंटबाजी! भररस्त्यात गाडी आडवी लावली, वाहनांच्या रांगा लागल्या अन्.. संतापजनक VIDEO

दिल्ली (Delhi)मेट्रोमध्ये महिलांची तर कधी काही प्रवाशी लहान - मोठ्या कारणांवरुन भांडणे होताना दिसतात. आता पुन्हा एकदा एका वयोरुद्ध व्यक्तीची आणि एका व्यक्तीचे मेट्रोतील सीटवरुन भांडणे झाली आहेत. यायाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Viral Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक वयोरुद्ध व्यक्ती दरवाजाच्या बाजूला असलेल्या मेट्रोच्या सीटवर बसलेला आहे. या वयोरुद्ध व्यक्तीच्या बाजूला दोन महिला प्रवासी बसलेले आपल्याला दिसून येत आहे. वयोरुद्ध व्यक्तीच्या बाजूला मेट्रोचा दरवाजासमोर अनेक प्रवासी थांबलेले आहेत. या प्रवाशांपैकी एका व्यक्तीशी वयोरुद्ध व्यक्ती वाद घालत आहे.

मेट्रोमध्ये होत असलेल्या या भांडणाचा व्हिडिओ सहप्रवाशाने मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या भांडणाचे कारण मेट्रोतील सीटवरुन झाल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमधून समजत आहे.@Ghar Ke Kalesh या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. हे तर आता रोजचंच झालं आहे,अशा प्रतिक्रिया अनेक नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Viral Video
BSF Jawan Singing Viral Video : 'तु है तो मुझे फीर और क्या चाहिए'..., भारत- बांग्लादेश सीमेवर घुमला BSF जवानाचा आवाज, Video तुफान व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com