Viral Video : सापांचं हाॅस्टेल! टाकीत नजर गेली अन् झोप उडाली; लपले होते ७० हून अधिक साप, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

Snakes Viral Video : एका व्यक्तीच्या घरातील टॉयलेटच्या टाकीत ७० पेक्षा जास्त साप आढळले आहेत. घराशेजारी राहणाऱ्या एकाने विषारी साप मच्छरदाणीच्या साथीने टाकीच्या बाहेर काढल्याचे म्हटले जात आहे.
Snakes Viral Video
Snakes Viral VideoX
Published On

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ शेअर केले जातात. सध्या एका व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. एका घराच्या टॉयलेटच्या टाकीत ७० पेक्षा जास्त विषारी साप असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. उत्तरप्रदेशच्या महाराजगंज येथील सोनौली कोतवाली परिसरात असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने पोलीस स्टेशन परिसरातील हरदीदली क्रॉसिंगवर घर बांधले. जेव्हा त्याने घरातील टॉयलेटची टाकी स्वच्छ करण्यासाठी उघडली तेव्हा धक्कादायक दृश्य दिसले. टाकीचे झाकण उचलल्यानंतर त्याला टाकीत मोठ्या संख्येने विषारी सापांनी तळ ठोकल्याचे पाहायला मिळाले.

Snakes Viral Video
वैष्णवी हगवणेचा मृत्यू कसा झाला? पोस्टमार्टममधून धक्कादायक माहिती समोर

७० पेक्षा जास्त विषारी साप दिसल्यानंतर तातडीने वन विभागाला संपर्क करण्यात आला. पण वन विभागाचे अधिकारी न पोहचल्याने गावातील एका तरुणाने धाडस दाखवले. टॉयलेटच्या टाकीत प्रवेश करुन त्याने सापांना बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, हरदीदली बरखा टोला येथील रहिवासी इस्लाम उर्फ नंऐ खान याने धाडस दाखवले. मच्छरदाणीच्या मदतीने त्याने सापांना टाकीतून बाहेर काढले.

Snakes Viral Video
Vaishnavi Hagawane : ५१ तोळे सोनं, आलिशान गाडी तरीही, छळ... राजकीय नेत्याकडून सुनेचा हुंडाबळी?

ज्या वेळेस नंऐ खान टाकीतून सापांना बाहेर काढत होता, तेव्हा काहीजण या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सर्वजण खानच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. यादरम्यान सोनौली पोलीस ठाण्याचे प्रभारी अजित प्रताप सिंह यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.

Snakes Viral Video
सासू-नणंदेनं मारलं, अंगावर थुंकली; वैष्णवी हगवणेच्या छळाची कहाणी सांगताना आईवडिलांना कोसळलं रडू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com