Viral Video: पुणे तिथे काय उणे! भारताच्या विजयानंतर FC रोडवर क्रिकेट प्रेमींचा प्रचंड जल्लोष; एकदा पाहाच काय केलं...

IND VS PAK Viral Video: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाचव्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करत दणदणीत विजय मिळवला, जो एक रोमांचक आणि उत्साही लढत ठरला.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाचव्या आणि अत्यंत उत्साही सामन्यात भारताने पाकिस्तानला हरवत दणदणीत विजय मिळवला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळलेला हा सामना भारतासाठी ऐतिहासिक ठरला, जिथे टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या विजयाचा आनंद विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

पुण्यातील एफसी रोडवर क्रिकेट प्रेमींनी एकत्र येऊन हजारोंच्या संख्येने जल्लोष केला. फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण गाजलं आणि पुणेकरांनी विजयाच्या आनंदात राडा केल्याने परिसरात चांगलाच उत्साह दिसला. या घटनांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन क्रिकेट फॅन्सनी आनंद व्यक्त केला. पुण्यातील एफसी रोडवर सण-समारंभाच्या वेळी तरुणाई मोठ्या संख्येने एकत्र येते, असाच दृश्य भारताच्या विजयावर जल्लोष करताना दिसला.

Viral Video
Viral Video: वाह रे पठ्ठ्या! न्हाव्याने मुलीचे केस कापायचे सोडून केलं असं की... VIDEO पाहून तुम्हीही व्हाल आवाक

या व्हिडीओमध्ये भारताच्या दणदणीत विजयाच्या आनंदात क्रिकेट फॅन्स रस्त्यावर आले आणि त्यांनी मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी केली, गाणी लावली आणि थिरकले. काहींनी विराट कोहलीचे पोस्टर घेऊन नाचले, तर काहींनी रोहित शर्माच्या पोस्टरवर डान्स केला. काही तर ट्रॉफी हातात घेऊन गाड्यांवर चढून जल्लोष करत होते. पुणेकरांची ही खासियत आहे, अशी गर्दी पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊन पुणेकरांच्या उत्साहाचे दर्शन घडले.

Viral Video
Shocking Video: अरे बापरे...चिमुकल्याने दातांनी उचलल्या ७ विटा, व्हायरल VIDEO पाहून सर्वांनाच धक्का

कालच्या शानदार विजयामुळे भारत सेमीफायनलमध्ये पोहचला आहे, तर पाकिस्तान स्पर्धेतील बाहेर पडला. भारताने पाकिस्तानला ६ विकेट्सने धुव्वा उडवला आणि २४२ धावांचे लक्ष्य ४३ ओव्हर्समध्येच पूर्ण केले. विराट कोहलीने वनडे फॉर्मॅटमधील ५१वे शतक साजरे करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या या विजयाने त्याला सलग दुसऱ्या विजयाचा स्वाद चाखला, तर पाकिस्तानला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

Viral Video
Shoking Video: बाप रे! बाटली समोर धरताच कोब्राने व्यक्तीवर केला हल्ला, व्हायरल VIDEO पाहून नेटकरी चकित

कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि संपूर्ण संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. भारताने या विजयासह २०१७ मधील पराभवाचा बदला घेतला. विराट कोहलीने १११ चेंडूत ७ चौकारांसह नाबाद १०० धावा करत आपले ५१वे वनडे शतक पूर्ण केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २४२ धावांचे लक्ष्य सहजपणे पूर्ण केले. विराट कोहलीच्या उत्कृष्ट शतकामुळे भारताच्या विजयाला एक नवीन रंग मिळाला, आणि त्याच्या पुनरागमनाचा डंकाही वाजवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com