Viral Video: वाह रे पठ्या! तरुणाने थेट घराच्या छतावर उभारलं क्रिकेट ग्राउंड; अनोख्या VIDEOने वेधले सर्वांचे लक्ष

Cricket Lover Viral Video: सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात त्याचे क्रिकेटवर असलेले वेड आपल्याला दिसून येते.
Viral Video
Viral VideoSaam Digital
Published On

Youth Built Cricket Ground on the Home Roof

देशभरात क्रिकेटप्रेमीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. क्रिकेट(cricket) हा फक्त खेळ नसून ती एक भावना आहे. आपल्याला प्रत्येक रस्त्यावर असेल किंवा गल्लीबोळ्यात सुट्टीच्या दिवशी तरुणाई तसेच लहान मुलं हमखास क्रिकेट खेळताना दिसून येतात. सध्याच्या टीम इंडियामधील आपण अनेक खेळांडूची क्रिकेटची सुरुवात नक्कीच ऐकली असेलचं मात्र सध्या सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात त्याचे क्रिकेटवर असलेले वेड आपल्याला दिसून येते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणताही व्यक्ती आवडते काम करण्यासाठी कधीही मागे हटत नाही.मग ते काम करताना आलेले कितीही अडथळे तो सरास बाजूला सारतो. आपण याआधीही अनेक व्यक्तींच्या गोष्टी ऐकल्या आहेत ज्यात एखाद्या कलेचे वेड त्या व्यक्तीला काहीही करण्यास भाग पाडते त्यात व्हायरल होत असलेल्या या क्रिकेटप्रेमी तरुणाने थेट त्याच्या घराच्या छतावरच भलमोठ क्रिकेट ग्राउंड उभारल आहे, सध्या या क्रिकेट ग्राउंचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एका घराच्या छतावर बांबू तसेच ड्रिल मशीन आणि क्रिकेट नेट ठेवलेली आहे. यानंतर तो तरुण बांबूला ड्रिस मशीनने काही छिद्र पाडून ते बांबू छताच्या काठावर उभे करुन व्यवस्थित लावताना दिसत आहे. छताच्या सर्व कोपऱ्यांमध्ये बांबू लावून झाल्यानंतर तरुण त्या बांबूवर क्रिकेट नेट लावत आहे. काही वेळानंतरच तरुण घराच्या गच्छीचे भल्यामोठ्या क्रिकेटचे मैदानात रुपांतर करतो. हे सर्व झाल्यानंतर तो तिथे लाईट्स लावतो आणि व्हिडिओच्या शेवटला तरुण तिथे क्रिकेटचा सराव करताना दिसत आहे.

या क्रिकेटप्रेमी तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावरील @tanzeem_malik या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. प्रत्येक नेटकऱ्यांकडून या तरुणाचे मोठ्या प्रमाणात कौतूक होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com