डोळ्यांचे पारणे फेडणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा; पाहा AI व्हिडिओ

Shivaji maharaj rajyabhishek ai video: सोशल मीडियावर सध्या एक प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा व्हिडिओ एक AI चा आहे. ज्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी मिळत आहे.
Shivaji maharaj rajyabhishek ai video
Shivaji maharaj rajyabhishek ai videoSaam Tv
Published On

Rajyabhishek Sohala: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाच्या अभिमानाचे प्रतीक आहे. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे पराक्रम, शौर्य आणि लोककल्याणासाठी झगडण्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. अशा या महान योद्ध्याच्या जीवनातील एक ऐतिहासिक आणि तेजस्वी क्षण म्हणजे राज्याभिषेक सोहळा. आता याच ऐतिहासिक क्षणाला नव्या युगात, नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा जिवंत केलं आहे ते म्हणजे AI च्या माध्यमातून.

सध्याच्या काळात AI (Ai)म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने फोटो आणि व्हिडिओ तयार करण्याचा जबरदस्त ट्रेंड तरुणाईमध्ये सुरू आहे. सोशल मीडियावर रोज नवीन AI जनरेटेड व्हिडिओज, फोटो, आर्टवर्क्स आणि रील्स पाहायला मिळतात. यामध्ये सध्या ऐतिहासिक घटना, व्यक्तिरेखा, भविष्याची कल्पना किंवा एखाद्या काल्पनिक दृश्याचा हुबेहूब अनुभव घेता येतो.

सध्याचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा आहे. या संपूर्ण व्हिडिओत तुम्हाला हुबेहुब तुम्ही शिवराज्याभिषेकसोहळ्याच्या जागी आहेत असं वाटेल. हा व्हिडिओ सध्या एक्सवरील @gabbarsiingh या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे आणि कॅप्शनमध्ये,''AI ने बनवला डोळ्यांचे पारणे फेडणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा! व्हिडिओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही''असे लिहिण्यात आलेले आहे.

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

ai चा हा व्हिडिओ(Video) पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने म्हटलं,''खरंच नव्या युगात हे पाहून भारी वाटलं'' तर दुसऱ्या यूजरने म्हटलं''मानलं राव व्हिडिओची ही कल्पना मांडणाऱ्याला'' तर अनेकांनी''कौतुकास्पद प्रतिक्रिया दिलेल्या आहेत''.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

Shivaji maharaj rajyabhishek ai video
Couple Dance Video: कमालच! दादा कोंडकेच्या गाण्यावर नवरा-बायकोचा डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com